मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरातील राहत्या घरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचादेखील मृत्यूदेह घरात आढळून आला आहे. दरम्यान मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा सागर पाठक (Shikha Pathak) (वय 32) व रिधान (वय साडेतीन वर्षे, रा. साई सिद्धी अपार्टमेंट हॉटेल एक्स्प्रेस इनच्या पाठीमागे) त्यांनी राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय खरात (Vijay Kharat), सहाय्यक आयुक्त सोहेल शेख (Sohail Sheikh), इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर (Nilesh Mainkar) यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

बेडरूमचा दरवाजा उघडला असता पोलिसांना साडेतीन वर्षाचा मुलगा रिधान हा बेडरूममध्ये मृत अवस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी मुलांच्या तोंडावर उशी दाबून खून केला असावा व नंतर आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आलेली आहे.

याबाबत अद्यापपर्यंत महिलेच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल केली नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. पुढील तपास वपोनी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com