अंबड हादरले; एकाच रात्री दोन घरफोडी

file photo
file photo

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने परिसर दहशतीखाली आला आहे. याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन बापू भोजने ( ७९, रा. एन ९/जे१/८/१ महाराणा प्रताप चौक नवीन नाशिक ) हे ( दि. १८ ) रात्री दहा वाजता आपल्या मुलीकडे केले होते ते सकाळी परत आल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ते 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसर्‍या घटनेत अंबड औद्योगिक वसाहतीत कॉपर ट्रॅक इंडस्ट्रीज प्लॉट नंबर 76 मध्ये ( दि.12 ते दि. 13 ) च्या दरम्यान तांब्याच्या वायरी सह ॲल्युमिनियम च्या व इतर वस्तु असा ७१ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी नथुराम सोनाजी शेजवळ यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com