ओबीसी आरक्षणाशिवाय जि.प, पं.स. च्या निवडणुका घेवू नये

ओबीसी आरक्षणाशिवाय जि.प, पं.स. च्या निवडणुका घेवू नये

निफाड । प्रतिनिधी Niphad

केंद्र सरकारने (central government) राज्य सरकारला (state government) इम्पेरिकल डेटा (Imperial data) न दिल्याने न्यायालयाने ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द केले आहे. साहजिक यामुळे बाराबलुतेदार अलुतेदार व ओबीसी समाजावर (BOC Community) अन्याय झाला आहे.

त्यामुळे आता जोपर्यंत ओबीसींना आरक्षण (Reservations) मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत (grampanchayat), पं.स. (panchayat samiti), जि.प. (zilha parishad) च्या निवडणुका (election) घेवू नये अन्यथा येणार्‍या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा बारा बलुतेदार संघटनेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पेंढारकर (Balasaheb Pendharkar) यांचेसह पदाधिकार्‍यांनी दिला. शासनाने नगरपंचायत (nagar panchayat), नगरपालिका (Municipality) व महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच घेतल्याने या समाजावर अन्याय झाला आहे.

सध्या होत असलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकीमध्ये ओबीसी जागेवर आता सर्वसाधारण जागेसाठी उमेद्वार उभे राहत असल्याने या उमेद्वारांना आम्ही काळ्या फिती बांधून मतदानाचा हक्क (Right to vote) बजावणार आहे. ओबीसींना त्यांचे हक्क मिळावे यासाठी केंद्र शासनाने इम्पेरिकल डेटा न्यायालयात सादर करून आम्हाला आरक्षण मिळणेसाठी प्रयत्न करावेत असेही निवेदनात (memorandum) नमूद करण्यात आले आहे.

निवेदनाची प्रत तहसीलदार शरद घोरपडे यांना देण्यात आली असून याप्रसंगी बारा बलुतेदार-अलुतेदार संघटनेचे बाळासाहेब पेंढारकर यांचेसह शिवाजी पहाडे, राजाराम नागरे, वकील शेख, हरिष आहेर, ज्ञानेश्वर थेटे, संदिप आहेर, सोमनाथ खैरनार, महेश निकम, रमेश वावधाने, दिलीप क्षीरसागर आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com