खडकमाळेगाव । khadkeMalegoan

येथील वायरमन संदीप बाबूराव सोनवणे (42) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

खडकमाळेगाव येथे 33/11 सबस्टेशन अंतर्गत 106 रोहित्र असून या रोहित्रांसाठी एक सेवक आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे. त्यामुळे विजेची दुरुस्ती, वीजबिल वितरण, वीज थकबाकी वसुली अशा सर्व कामांना वायरमनची संख्या अपुरी पडते.

येथील विद्युत पुरवठा करणार्या रोहित्राच्या खांबावर रविवार दि.२१ रोजी संदीप बाबूराव सोनवणे हे चढले असता त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. येथील रोहित्रांची संख्या विचारात घेता येथे किमान पाच वायरमनची नेमणूक करून ग्राहकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास रायते यांचेसह नागरिकांनी केली आहे.