अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार पोहचल्या थेट हिवाळी अधिवेशनात

अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार पोहचल्या थेट हिवाळी अधिवेशनात

नागपूर | Nagpur

कोणतीही गोष्ट करतांना त्यामध्ये कर्तव्य हे श्रेष्ठ असल्याचे आपण वारंवार पाहत असतो. हीच कर्तव्याची श्रेष्ठ भावना आजपासून नागपूरमध्ये (Nagpur) सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात (winter session) एका महिला आमदाराच्या माध्यमातून पाहायला मिळाली...

नाशिकच्या देवळाली मतदार संघातील (Deolali Constituency) राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या आज अधिवेशनात आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आल्या. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार पोहचल्या थेट हिवाळी अधिवेशनात
सीमावादावरुन अजित पवारांचा प्रहार; मुख्यमंत्री म्हणाले...

आहिरे यांच्या अडीच महिन्याच्या बाळाचे नाव प्रशंसक प्रवीण वाघ असे असून त्याचा जन्म ३० सप्टेंबरला झाला आहे. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने आमदार आहिरे या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. त्यावेळी अडीच महिन्याचा प्रशंसक विधानभवनातील राजकीय गोंधळापासून अलिप्त राहून आपल्या आईच्या (Mother) कुशीत निवांत झोपलेला दिसला.

यावेळी आहिरे यांनी बोलतांना सांगितले की, एक आई म्हणून बाळाची काळजी घेत आहे, तर एक आमदार म्हणून मतदारांना न्याय मिळावा म्हणून अधिवेशनात सहभागी झाले आहे. अधिवेशनात मतदारसंघातील प्रश्न मांडणे हे आमदार म्हणून माझे कर्तव्य आहे. माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आहे. ते मांडण्याची अधिवेशनात संधी असते. ती मला गमवायची नव्हती. बाळ अडीच महिन्याचे असल्याने त्याला सोडून येऊ शकत नव्हते. त्यामुळे मला बाळाला घेऊन यावे लागले, असे त्या म्हणाल्या.

अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार पोहचल्या थेट हिवाळी अधिवेशनात
वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात; एकाचा मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com