
नाशिक | Nashik
राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान पार पडले होते. यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) १८८ ग्रामपंचायतींसाठी ७९.६३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी (counting of votes) सुरु होती. यानंतर दुपारच्या सुमारास मतमोजणी संपल्यावर चित्र स्पष्ट झाले...
यामध्ये निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) २० ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज निकाल जाहीर झाले असून त्यात प्रस्थापितांना चांगलाच धक्का बसला आहे. निफाड तालुक्यातील २० ग्रामपंचायतींमधून भाजपचे ०३, शिवसेना ठाकरे गट ०५, राष्ट्रवादी काँग्रेस ०८ सरपंच निवडून आले आहेत. तर ०४ ठिकाणी अपक्ष सरपंच (Sarpanch) झाले आहेत.
निफाड तालुका (सरपंचपदी विजयी झालेले उमेदवार )
निमगांव वाकडा - पूजा दरकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पिंपळगांव बसवंत - भास्कर बनकर (ठाकरे गट )
थेटाळे - शितल शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
तारुखेडले - अनुसया आंधळे (ठाकरे गट)
खानगांव थडी - भाऊसाहेब दौंड (भाजप)
दिक्षी - योगेश चौधरी - (ठाकरे गट)
खडक माळेगांव - जगदीश पवार (अपक्ष)
नांदर्डी - जयश्री जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोटमगांव - आरती कडाळे (भाजप)
लोणवाडी - पल्लवी अमोल साळवे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बोकडदरे - विजय सानप (राष्ट्रवादी काँग्रेस)
कसबे सुकेणे - आनंदा भंडारे (अपक्ष)
कोकणगांव - सुरेखा मोरे (ठाकरे गट)
मांजरगांव - वंदना सोनवणे (अपक्ष)
पिंपळस - निशा ताजने (भाजप)
साकोरे मिग - शोभा बोरस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिंगवे - सुशीला पवार (अपक्ष)
सोनेवाडी खु. - नंदा आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
धारणगांव वीर - दिपक सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
चांदोरी / नागापुर - विनायक खरात (ठाकरे गट)