पक्षाचे कार्यक्रम राबवून जनतेची मने जिंका : करंजकर

पक्षाचे कार्यक्रम राबवून जनतेची मने जिंका : करंजकर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी महानगरपालिका निवडणुका (Municipal elections) जिंकायच्याच असा पण करून आतापासूनच तयारीला लागा. शिवसंपर्क अभियानांतर्गतचा शिवसेना (shiv sena) मनामनात शिवसेना घराघरात हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवून जनतेच्या हृदयसिंहासनावर राज्य करा,असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख विजय करंजकर (District Chief Vijay Karanjkar) यांनी केले.

प्रभाग क्रमांक 2 मधील बूथप्रमुखांचा मेळावा (Meeting of booth heads) आडगाव (Adgaon) जत्रा-नांदूर रोडवरील रामलीला लाँन्स येथे आयोजित करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून करंजकर बोलत होते. बुथप्रमुख हाच पक्षाचा महत्वाचा दुवा असतो. त्यामुळे कोणत्याही निवडणुका (election) जिंकायच्या असतील तर बूथप्रमुखांना विश्वासात घेऊनच डावपेच आखावे लागतील. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी त्याना ठेवावी लागेल, असे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड (datta gaikwad) यांनी आवाहन केले.

2022 च्या महापालिका निवडणुका आपणास केवळ जिंकायच्याच नाहीत तर 100 प्लस जागा मिळवून आपणास इतिहास घडवायचा आहे आणि त्यादृष्टीने आपली संपर्क यंत्रणा सक्षम करा,असे माजी जिल्हाप्रमुख सुनिल बागुल (sunil bagul) यांनी बुथप्रमुखांशी संवाद साधतांना सांगितले.या वेळी माजी महानगरप्रमुख महेश बडवे, यांनी प्रत्येक शिवसैनिकाने विभागात फिरून जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत, शिवसैनिक खूप प्रामाणिक असतो, येणार्या महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

अ.भा.वि.सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे महानगर संघटक दिगंबर मोगरे, योगेश बेलदार, नाशिकरोडचे म.न.पा.प्रभाग सभापती प्रशांत दिवे, युवासेनेचे रूपेश पालकर, सुरेश मते, उपमहानगरप्रमुख सुनिल जाधव, अमोल सुर्यवंशी, शैलेश सूर्यवंशी, पोपट शिंदे, संदीप लभडे , सजंय माळोदे, , सजंय शिंदे हे व्यासपिठावर उपस्थित होते. तर सुनील निरगुडे, अमोल निमसे,राजेंद्र वाकसरे, राहुल देशमुख,गोकुळ मते,निलेश मोरे,सागर भोजने,

स्वंप्निल जाधव,सिध्देशर अंडे, दिपक सूर्यवंशी,राजेंद्र आहेर, राजेंद्र जाधव, शिवसेना पदाधिकारी यां सह बूथप्रमुख उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपहानगरप्रमुख सुनिल जाधव, उपमहानगर प्रमुख अमोल सूर्यवंशी, भा.वि.सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे , विभाग संघटक पोपट शिंदे, मा उपविभागप्रमुख संदीप लभडे. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले आभार सुनील जाधव यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com