क्रीडा संकुल पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार: आ.पवार
नाशिक

क्रीडा संकुल पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार: आ.पवार

Abhay Puntambekar

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

सुरगाणा सारख्या आदिवासी भागात खेळाडू करीता सोयी सुविधा उपलब्ध नसतांना खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय ऑलंपिक स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पदके मिळविले आहेत.त्याकरीता तालुका क्रीडा संकुल पुर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.

शासनाकडे चार कोटी रुपयांची मागणी केली आहे. नगरपंचायतीकरीता वैशिष्टय पुर्ण विकास योजनेर्गंत विकास आराखडयात पाच कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. शासकीय विश्रामगृहात अधिकार्‍यांसमवेत विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आढावा घेण्यात आला. यामध्ये करोना प्रतिबंध करीता करावयाच्या उपाययोजना, पावसाअभावी खोळंबलेली भाताची आवणी, शैक्षणिक सुविधा, रस्ते,वीज,पिण्याचे पाणी,शेतकरी विमा या विषयावर चर्चा करण्यात आली.

शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त समस्या मांडाव्यात त्या सोडविण्या करीता निश्चितपणे शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत तहसिलदार विजय सुर्यवंशी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नाईक, महेश पाटील, पवार, भोये, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, आनंदा चौधरी, नवसू गायकवाड, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, कृषि अधिकारी अशोक डमाले, नगरसेवक ज्ञानेश्वर कराटे, रंजना लहरे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com