क्रीडा क्षेत्रातील गैरप्रकार थांबवणार

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना जनरल सेक्रेटरी- नामदेव शिरगावकर
क्रीडा क्षेत्रातील गैरप्रकार थांबवणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बोगस क्रीडा प्रमाणपत्र Duplicate sports certificate मिळवून शासकीय नोकरी Government Service मिळवण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. प्रमाणपत्र स्वीकारणार्‍या इतकेच असे बोगस प्रमाणपत्र तयार करून वाटप करणारे दोषी आहेत. त्यांच्यामुळे संघटनांची दुसरी बाजू समोर येऊन क्रीडा क्षेत्राची बदनामी होत आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन कठोर पावले उचलणार असून त्यासाठी एक आचारसंहिता तयार करणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे जनरल सेक्रेटरी नामदेव शिरगावकर Namdev Shirgaonkar, General Secretary, Maharashtra Olympic Association यांनी दिली.

83 व्या राज्य टेबल टेनिस स्पर्धेचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेेचे उद्घाटन रविवारी शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत शिरगावकर यांनी सांगितले की, गेल्या कोरोना व त्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून क्रीडाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहेत. खेळाडूसह क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा संघटना या सर्व अडचणीत आलेल्या आहेत. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने सर्व नियमांचे पालन करत अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे क्रीडाक्षेत्राला नवसंजीवणी मिळणार आहे.

क्रीडा चळवळ वाढावी यासाठी क्रीडा शिक्षक महत्वाचा आहे. क्रीडा शिक्षक टिकला तरच क्रीडा संस्कृती टिकेल. खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा शिक्षकाची भूमिका ही सर्वात महत्वाची असते. तसेच बोगस क्रीडाप्रमाणपत्राचे प्रकार राज्यभरास उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे क्रीडाक्षेत्राची मोठी बदनामी झाली आहे. काही संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या या गैरप्रकाराला आळा घालण्यसाठी नियमावली तयार केली जाणार आहेत. तसेच सर्व क्रीडा संघटनानी एकत्र येत हे प्रकार रोखण्यााठी पुढाकार घेतला पाहिजे असेही स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.यावेळी नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी केंद्र सरकारच्या योजना नाशिककमध्ये आणाव्या, नाशिकमध्ये क्रीडा चळवळ जोर धरत असून त्याला प्रोत्साहन देणे तसेच वाढत चाललेले बोगस प्रमाणपत्र प्रकरण वेळीच रोखून नवी आचारसंहिता राबवावी या अपेक्षा शिरगावकर यांच्याकडे केल्या.

खेळांडूचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑलिम्पिक भवन

राज्यातील विविध क्रीडा संघटना, खेळांडूचे प्रश्न सोडविण्यासाठी मध्यवर्ती केंद्र असावे, यासाठीच पुण्यात ऑलिम्पिक भवनची निर्मिती केली जाणार आहे. त्याठिकाणी खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू यांच्या सर्वाशी चर्चा करत उपायोजना करण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तो निर्णय संघटनेचा

बोगस प्रमाणपत्र वाटप प्रकरणी गुन्हा दाखल असलेले अशोक दुधारे हे ऑलिम्पिकमध्ये निरीक्षक म्हणून कसे दाखल झाले. याबाबत विचारणा केली असता त्यांच्या संघटनेकडून त्यांना पाठविण्याबाबत शिक्कामोर्तब झाले होते; तसेच त्यांचे नाव प्राप्त झाल्यानंतर कोणीही त्यांच्याबाबत आक्षेप घेतला नाही, असे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com