निधी वाढवून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार - जि. प. अध्यक्ष क्षिरसागर

निधी वाढवून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार - जि. प. अध्यक्ष क्षिरसागर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेला Nashik Zilla Parishad प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या 32.80 कोटी रुपयांच्या निधीचे समान वाटपाच्या मागणीसाठी Distribution of funds सदस्यांनी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर Z.P. President Kshirsagar यांच्या दालनात ठिय्या मांडत निधीसाठी आग्रह धरला. अध्यक्ष क्षीरसागर यांनी सदस्यांना विश्वासात घेऊन निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सदस्यांना दिले.

जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या 32.80 कोटी रुपयांच्या निधीचे सदस्यांना समान वाटप करण्याऐवजी असमान वाटप झाल्याने आक्रमक झालेल्या सदस्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार अध्यक्ष क्षीरसागर यांच्या दालनात ठिय्या मांडत हक्काच्या निधीसाठी आग्रह धरला. क्षीरसागर यांनी सोमवारपर्यंत वेळ देण्याचा निर्णय घेतला असला तरी मात्र, त्यानंतर निधी न मिळाल्यास थेट उपोषण केले जाईल, असा इशारा सदस्यांनी यावेळी दिला. यात विशेष म्हणजे महिला सदस्यांची संख्या मोठी होती.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे असमान निधी वाटपाची सदस्यांमधील खदखद उफाळून आली होती. निधी वाटपात अन्याय झालेल्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानुसार, माजी सभापती मनिषा पवार, सुनीता चारोस्कर, नयना गावित, सिमंतिनी कोकाटे या सदस्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी अध्यक्ष दालनात येऊन ठिय्या मांडला. अध्यक्ष क्षीरसागर यांनी सदस्यांशी चर्चा करत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निधी वाटपात सदस्यांना कमी-जास्त निधी दिल्याचा आरोप सदस्यांनी केला.

सर्व सदस्यांना समान निधी देण्याचा ठराव झालेला असताना अन्याय झाल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. यावर अध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले की, सदस्यांना निधीचे वाटप केले आहे. मात्र, वाढीव निधीसाठी वेळ द्या, प्रशासनाशी चर्चा करून सोमवारपर्यंत निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन त्यांनी सदस्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी गीतांजली पवार-गोळे, कलावती चव्हाण, मीना मोरे, रेखा पवार, साधना गवळी, गणेश अहिरे, शोभा कडाळे, हरिदास लोहकरे, अशोक टोंगारे, कविता धाकराव, रोहिणी गावित, दीपक शिरसाठ आदी सदस्य उपस्थित होते.

15 व्या वित्त आयोगाच्या निधीचे वाटप करताना सर्व सदस्यांना वाटप करण्यात आलेले आहे. कोणत्याही सदस्यांवर अन्याय केलेला नाही. काही सदस्यांना कमी निधी मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. निधी वाढवून देण्याबाबत सर्व सदस्य तसेच प्रशासनाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

- बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जि. प.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com