व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ - पालकमंत्री भुजबळ

व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ - पालकमंत्री  भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील व्यापार्‍यांच्या अडचणी समजून घेत नाशिकमधील करोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.

लॉकडाऊनमुळे नाशिकमधील व्यापार उद्योग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापार उद्योग सुरू करण्यासाठी व व्यापार्‍यांच्या विविध अडचणी संदर्भात महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मधील व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने आज दि. 16 मे रोजी भुजबळ फार्म येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिनांक 13 मे रोजी झूम अ‍ॅपवर नाशिकमधील व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यापार्‍यांनी मांडलेल्या विविध अडचणी पालकमंत्री भुजबळ यांच्या समोर मांडल्या. त्यात प्रामुख्याने व्यापार सुरु, व्यापार्‍यांना आर्थिक मदत मिळणे, वीज बिल, मालमत्ता कर, बँक कर्जांवरील व्याज माफ करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या गाळ्यांचे तीन महिन्यांचे भाडे माफ करणे, जीएसटी, इन्कम टॅक्स अशा विविध स्वरूपाचे कर भरण्यासाठी सप्टेंबर 21 पर्यंत मुदत द्यावी,

लघु व मध्यम व्यापार्‍यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या 10 टक्के रक्कम वार्षिक 3 टक्के व्याजाने कर्ज रूपाने द्यावी आदि मागण्या केल्या व व्यापार्‍यांच्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे पालकमंत्र्यांना आवाहन केले.ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश चावला यांनी अत्यावश्यक सेवेत येणार्‍या वाहनांसाठी स्पेअर पार्ट्सची दुकाने उघडणे गरजेचे असल्याचे सांगून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या अडचणी मांडल्या.

बैठकीस महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारणी सदस्य सचिन शहा, ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश आचरा, ऑटोमोबाईल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश चावला, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, नाशिक किरकोळ किराणा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्रभाई पटेल, नाशिक घाऊक किराणा धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, दि नाशिक रिटेल क्लाथ मर्चंट्स असोसिएशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर संपत काबरा, नरेश पारख, तुषार मणियार, व्यापारी. संजय सोनवणे, मेहुल थोरात, चेंबरचे सहाय्यक सचिव अविनाश पाठक आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com