त्र्यंबकेश्वर भाविकांची लूट थांबवणार : उमाप

त्र्यंबकेश्वर भाविकांची लूट थांबवणार : उमाप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर भाविकांची रिघ पाहायला मिळते. देश-विदेशातून भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी त्र्यंबकला आवर्जून येतात.अनेक वर्षांपासून येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे चित्र आहे.

यात लक्ष घालून त्र्यंबकेश्वरला होणारी भाविकांची लूट थांबवणार, अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Nashik Rural Superintendent of Police Shahaji Umap) यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे माध्यमांशी संवाद साधतांना दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी शहाजी उमाप यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्विकारली. तालुका पोलीस ठाणे येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्रंबकेश्वर येथे एमएच 15 वगळता इतर सर्व भाविकांच्या वाहनांची पोलिसांतर्फे तपासणी केली जाते.

याठिकाणी बाहेरगावच्या वाहनांची लूट केली जात असल्याची वारंवार तक्रार येत असतात.याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी अधीक्षक शहाजी उमाप यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले कि, याप्रकरणी चौकशी केली जाईल व भाविकांची होणारी लूट थांबवू.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com