कामगारांसाठी दवाखाना सुरू करणार

कामगारांसाठी दवाखाना सुरू करणार

स्टाईस प्रशासक मंडळ अध्यक्षा सुधा माळोदे-गडाख

सिन्नर। वार्ताहर sinnar

तालुक्यात ईएसआयसीचे हॉस्पिटल Esics Hospital सुरु होण्यासाठी विलंब आहे. एसएमबीटी हॉस्पिटल SMBT Hospital किंवा शिर्डी संस्थानच्या मदतीने कामगारांसाठी लवकरच दवाखाना Hospital सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या प्रशासक मंडळ अध्यक्षा सुधा माळोदे-गडाख यांनी दिली. वसातीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

शिर्डी संस्थानला वसाहतीने जागा दिलेली असून त्यांच्या माध्यमाने दवाखाना सुरु करुन कामगारांना मोफत औषधोचाराची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टाइसवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त झाल्यानंतर प्रथमच अध्यक्षा माळोदे-गडाख, उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आगामी काळातील ध्येय धोरणांबाबतची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी माजी चेअरमन अविनाश तांबे, उद्योजक रामदास दराडे, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते विजय गडाख, संस्थेचे व्यवस्थापक कमलाकर पोटे उपस्थित होते. सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत आर्थिक फायदे घेतलेले परंतु वर्षानुवर्षे बंद असलेले व पुन्हा कधीही सुरु होऊ न शकणार्‍या बंद उद्योग घटकांची नवीन उद्योजकांस विक्री करुन त्यांचे नावे हस्तांतरण करण्यासाठी जाचक असलेली पाच वर्षे प्रसामान्य उत्पादनामध्ये ठेवण्याच्या कालावधीची अट कमी करुन लघु उद्योजकांसाठी तीन वर्षे, मध्यम व मोठ्या उद्योगांना फक्त पाच वर्षे व मेगा उद्योगांना सात वर्षे प्रसामान्य उत्पासनात असलेले सर्व बंद उद्योग घटक हस्तांतरणास परवानगी देण्यासाठीचा धोरणात्मक निर्णय घेऊन नवीन औद्योगिक धोरण 2018 मध्ये समावेश करण्याकरीता उद्योग उर्जा व कामगार विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे माळोदे, पाटील व शिंदे यांनी सांगितले.

उद्योगांना दररोज दीड हजार घनमीटर पाणीपुरवठा मंजूर असून हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे संस्थेने अनेक वर्षांपासून प्रलंबित एक हजार घनमीटरची वाढीव मंजुरी घेतलेली आहे. तथापि, त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने 3.19 कोटी भांडवली अंशदान रक्कम भरण्यास कळविलेले आहे. ही रक्कम संस्थेच्या दृष्टीने मोठी असून भांडवली अंशदान रक्कमेचे दहा वर्षांकरीता समान दहा हप्ते करुन दिल्यास संस्थेला 1 हजार घनमीटर पाणी उपलब्ध होणार असल्याचे माळोदे-गडाख म्हणाल्या. वसाहतीत सध्या 375 उद्योग सुरु असून 48 उद्योग बंदावस्थेत आहेत. त्यामुळे बंद पडलेले उद्योग सुरु करण्यास आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सहकार्याने प्राधान्य देणार असल्याची ग्वाही माळोदे-गडाख यांनी दिली. स्थानिक तरुण उद्योजकांनी बंद उद्योग सुरु करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रशासक मंडळ आपल्या दारी

प्रशासक मंडळाकडून औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक कंपनीत जात व्यवस्थापकांसोबत चर्चा करुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यांत कामागारांची कमतरता भासत आहे. तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे कारखानदारांना तोटा सहन करावा लागत असून यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मोळोदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com