
सुरगाणा । प्रतिनिधी | Surgana
आदिवासी भागात (tribal area) अद्यापही रस्ते (road), आरोग्य (health), दळणवळण (transportation), शेती (farming) करीता सिंचन (irrigation), कुपोषण (Malnutrition) या समस्या जैसे थे आहेत. एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो आहे.
पण अद्याप ही या मुलभूत समस्या आदिवासी पुढे आ वासून उभ्या आहेत त्या दुर करण्यासाठी येत्या काळात पेठ (peth), सुरगाणा (surgana), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) सारखे मागासलेल्या तालुक्यातील विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) भाजपा शिष्टमंडळाला (BJP delegation) दिले.
या शिष्टमंडळात अनुसूचित जमाती आदिवासी मोर्चा सरचिटणीस एन. डी. गावित (Scheduled Tribe Tribal Morcha General Secretary N. D. Gavit), तालुका भाजपा अध्यक्ष रमेश थोरात, सुनिल भोये, वामन गवळी, भास्कर अलबाड, यशवंत देशमुख, किसन पवार आदींचा समावेश होता.
कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) पदाची शपथ घेतलेले विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी नाशिक (nashik) मध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यातील आदिवासी बांधव (tribal community) विकासापासून वंचित असून राज्यातील कुपोषण ही सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी आदिवासी समाजाची प्रगती होणे गरजेची असून सरकार आदिवासींच्या समस्यांवर काम करणार आहे. समाजाच्या विकासाला आता चालना मिळणार आहे अशा आशावाद यावेळी मंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) यांनी बोलताना आदिवासी समाजाला भेडसावणार्या बर्याचशा अडचणी वंचित राहिलेल्या पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील आदिवासी समाजा वंचित राहिला असून पायाभूत सुविधा देखील आदिवासींना मिळत नसल्याचे दिसून येत आहे यासाठी आदिवासी भागात प्रथमतः दळणवळणाच्या सोयी करून देणे आवश्यक आहे.
दळणवळणाच्या सोयी झाल्यास त्यांना शहराशी तालुक्याशी संपर्क राहील त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्यातून आदिवासी बांधव विकसित होईल. आदिवासी पट्ट्यात प्राथमिक दृष्ट्या कुपोषण हा खूप महत्त्वाचा विषय असून यावर काम करणं महत्त्वाचं असणार आहे. आदिवासी भागात आरोग्य सुविधा चांगले रस्ते वाहतुकीच्या सुविधा नसल्याने आदिवासी परिसरातील लोक विकासापासून वंचित आहे अनेक वर्षापासून या अडचणी असून या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून राज्य सरकारचा भर असणार आहे असे मत यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले आहे.