उद्योजकांच्या वीजसमस्या सोडवू

महावितरण अधिकार्‍यांचे आयमाला आश्वासन
उद्योजकांच्या वीजसमस्या सोडवू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अंबड आणि सातपूर औद्योगिक परिसरात ( Industrial Area in Satpur & Ambad )सुरू असलेला विजेचा लपंडाव,त्यामुळे होणारे नुकसान तसेच विद्युत मंडळाशी संबंधित अन्य समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या महावितरणच्या ( Mahavitaran)अधिकार्‍यांनी आयमा ( AIMA ) पदाधिकार्‍यांसमवेत औद्योगिक परिसराची संयुक्त पाहणी केली. सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन महावितरण अधिकार्‍यांनी दिल्याचे आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले.

उद्योजकांना सलग वीज पुरवठा होत नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे, अशा आशयाचे निवेदन आयमा पदाधिकार्‍यांनी वीज महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना दिल्यानंतर उद्योजकांचा समस्या जाणून घेण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता पाटील आणि अंबडचे कनिष्ठ अभियंता जयंत बोडके यांनी आयमा कार्यालया उद्योजकांचे बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नंतर विविध सेक्टरमध्ये प्रत्यक्ष पहाणी केली.

बैठकीत उद्योजकांनी समस्यांचा पाढा वाचला त्यात पालापाचोळा व वेली त्वरित काढव्यात,उघड्या डीपी बंदिस्त कराव्यात,धोकेदायक पोल हटवावेत आदी मागण्या मांडल्या. योगेश्वर इंजिनीअरिंग, सुनील सर्व्हिसेस, अवधूत हीट ट्रीटमेंट, झिगमा पेंट्स, रिलीफ सर्जिकल,निशा एंटरप्राइजेस, आर. ए. इंजिनीअर्स, प्रसन्ना प्रीटीजन्स आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी समस्या मांडल्या.

चर्चेत आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, सचिव गोविंद झा, आयमा ऊर्जा समिती चेअरमन रवींद्र झोपे,जयंत जोगळेकर, हेमंत खोंड, विनीत पोळ, निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, कुंदन डरंगे, रमेश कनानी आदींनी सहभाग घेतला.

प्रत्येक महिन्यात दर शनिवारी आयमा पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊन परिसरातील मेंटेनन्सची कामे केली जातील व सर्व समस्या सोडवल्या जातील, असे महावितरण अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. वीजविषयक समस्या सोडवण्यासाठी महावितरण अधिकारी पावले उचलतील, अशी अपेक्षा आयमा अध्यक्ष पांचाळ यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com