ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणार : खा. गोडसे

ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणार : खा. गोडसे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या (Nashik Cooperative Sugar Factory)आगामी गळीत हंगामात ( Cane Crusing Season) 3.50 लाख मे टन ऊस गळपाचे उद्दिष्ट असून सन 2023- 24 गळीत हंगामापासून कारखाना 3500 मे टन गाळप क्षमतेने चालविण्या बरोबरच आसवानीसह इथेनॉल प्रकल्प उभा केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकर्‍यांना अधिकचा देण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन खा हेमंत गोडसे( MP Hemant Godse ) यांनी केले.आगामी 2022- 23 गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन प्रसंगी खा. गोडसे बोलत होते.

व्यासपीठावर संचालक दीपक चंदे, सागर गोडसे, शहेजाद पटेल, कार्यकारी संचालक एस.के. शेटे, पळसे सरपंच सुरेखा गायधनी, दिलीप गायधनी, बाबुराव मोजाड, रघुनाथ बरकले ,बाळासाहेब बरकले, रमेश आवटे, अशोक खालकर, संजय तुंगार, तानाजी गायधनी, नवनाथ गायधनी, तानाजी करंजकर, रत्नाकर गायकवाड, विष्णुपंत गायखे, विलास धुर्जड, गिरीश धुर्जड, सोमनाथ खातळे, नारायण मुठाळ, विलास गायधनी आदी उपस्थित होते.

यावेळी खा. गोडसे यांनी चाचणी गळीत हंगामात निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करून पुढील हंगामाची प्रशासनाने जोरदार तयारी केली असल्याचे सांगितले. याशिवाय आगामी हंगामात कारखान्याचे विस्तारीकरण आसवानीसह, इथेनॉल प्रकल्प सुरू करत असल्याचे नमूद केले.

प्रास्ताविक एस.के. शेटे यांनी केले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी कैलास टिळे यांनी कारखान्याचा सुवर्ण काळ पुन्हा येत असून सर्वांनी नासाकास उसाचा पुरवठा करण्याचे आवाहन केले. यावेळी बाबुराव मोजाड, रघुनाथ बरकले, रमेश आवटे यांनी परिसराच्या विकासाचे केंद्र असलेला नासाका चांगल्या प्रकारे चालणे सर्वांच्या भवितव्यासाठी गरजेचे असल्याचे सांगितले.

प्रारंभी संचालक सागर गोडसे यांच्या हस्ते मिल रोलरची पूजा करण्यात आली. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे, रवींद्र मालुंजकर तर आभार व ऊस विकास अधिकारी अरुण पाटील यांनी केले.

कार्यक्रमास विलास आडके, विष्णुपंत गोडसे, नामदेव बोराडे, बबनराव कांगणे, ग्राप सदस्य ताराबाई गायधनी, प्रिया गायधनी, कमल गायधनी, रत्ना पगार, सोनाली चारस्कर, शिवाजी मस्के, मधुकर सातपुते, आधी सहशेतकरी, ऊसतोड ठेकेदार, कारखाना अधिकारी, खाते प्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com