पतसंस्था फेडरेशनचे वकीलपत्र घेणारः आ.ढिकले

पतसंस्था पदाधिकारी एकदिवशी कार्यशाळा
पतसंस्था फेडरेशनचे वकीलपत्र घेणारः आ.ढिकले

डुबेरे । वार्ताहर | Dubere

जिल्हा बँकेतील (district bank) ठेवी काढण्यासाठी व अंशदान योजना रद्द करण्यासाठी शासनाकडे जिल्हा फेडरेशनचे (District Federation) वकीलपत्र घेतो,

अशा शब्दात आपली भूमिका मांडत सहकार मंत्र्यांची भेट घेऊन हे प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करेल. कोणत्याही आंदोलनाची (agitation) वेळ जिल्हा व राज्य फेडरेशनवर (District and State Federations) येणार नाही अशी ग्वाही आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले (MLA Adv. Rahul Dhikle) यांनी दिली.

नाशिक जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन (Nashik District Credit Unions Co-operative Federation) व सहकार भारती सहकार प्रशिक्षण संस्था (Sahakar Bharti Cooperative Training Institu) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या पदाधिकारी, वसुली अधिकारी, सेवक यांच्या एकदिवसीय कार्यशाळेत (workshop) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे होते. राज्यातील पतसंस्थेसमोरील बदलती आव्हाने, पतसंस्थामधील ठेवीवरील अंशदान रक्कम भरणे, नियामक मंडळ रद्द करणे आदी मागण्यांबाबत कोयटे यांनी विवेचन केले.

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पतसंस्था चळवळीत सेवकांचा सहभाग आणि कायदेशीर मार्गाने वसुलीचे प्रभावी व्यवस्थापन (Effective management of recovery) याबाबत मार्गदर्शन केले. महेश कुटे यांनी सीआरएआर बाबत मार्गदर्शन केले. नेटविन सॉफटवेअर कंपनीच्या (Netwin Software Company) प्रतिनधीनी पतसंस्थामध्ये आधुनिक तंत्रज्ञान (Modern technology) विकसित करण्यासंदर्भात माहिती दिली. संजय कळमकर यांनी ताण-तणाव मुक्तीसाठी विनोदाची उधळण करत संपर्ण सभागृहाला तणाव मुक्त केले.

डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सहकारी पतसंस्थेस सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय प्रथम दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल नारायण वाजे, राज्यस्तरीय द्वितीय दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल गोरक्षनाथ गायकवाड, कादवा सहकारी कारखान्याचे संचालक सुनील केदार, अ‍ॅड. अंजली पाटील, मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, कादवाचे पुरस्कार्थी बापूसाहेब गायकवाड, स्व. शांतीलाल सोनी पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी, फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोपान थोरात यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यशाळेचा समारोप पदवीधर शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रास्तविक नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष नारायण वाजे यांनी केले. सूत्रसंचलन फेडरेशनच्या जनसंपर्क संचालिका डॉ. अश्विनी बोरस्ते यांनी केले. संचालक दीपक महाजन यांनी आभार मानले. यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष के. के. चव्हाण, प्रशिक्षण समन्वयक राकेश चव्हाण, अशोक व्यवहारे, अशोक शिरोडे, शिवाजी पगार, चंद्रकांत गोगड, सुनील केदार, बापूसाहेब गायकवाड आदिंसह पतसंस्थाचे पदाधिकारी, सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com