
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक-अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहत (Satpur-Ambad Industrial area )परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाच्या वतीने केवळ अंबड औद्योगिक वसाहतीतील कचरा संकलनासाठी 6 घंटागाड्या (Ghantagadi )देण्यात आल्या. या माध्यमातून औद्योगिक वसाहतीच्या सहा भागांच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी केले. त्याबाबतच्या सूचना संबंधित विभागीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील कचरा संकलनासाठी स्वतंत्र 10 घंटागाड्या मंजूर करण्यात आल्या असून, त्यांच्या कार्यप्रणालीचा शुभारंभ मनपा अतिरिक्त आयुक्त आत्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, वरुण तलवार, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयूर पाटील, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सहसचिव गोविंद झा आदी होते.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपातर्फे प्रयत्न केले जातील. सीएसआर निधीतून सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केले.
यावेळी आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आयमाच्या गेल्या दहा वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र घंटागाड्या मंजूर झाल्याचे सांगितले. यावेळी बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सातपूर विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे, नवीन नाशिक विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, घंटागाडी व्यवस्थापक धनंजय साळवे, आयमाच्या मूलभूत सेवा समितीचे चेअरमन हेमंत खोंड, कुंदन डरंगे, दिलीप वाघ, अविनाश मराठे, हर्षद बेळे, राहुल गांगुर्डे, देवेंद्र राणे, अविनाश बोडके, सिद्धेश रायकर आदी उपस्थित होते.