
नाशिक | Nashik
लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ (Lasalgaon Railway Station) आज सकाळी टॉवर वॅगेन ट्रेनने चार कर्मचाऱ्यांना (Employees) उडवल्याची घटना घडली होती. त्यानंतर या चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत असून या घटनेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी गंभीर दखल घेतली आहे...
या घटनेबाबत बोलतांना डॉ. पवार म्हणाल्या की, रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू (Death) ही अतिशय धक्कादायक गोष्ट असून या घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच या अपघाताची माहिती समजतात डॉ. पवार यांनी घटनास्थळी व निफाड (Niphad) येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन संबंधितांकडून घटनेची माहिती घेतली.
तर या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी डॉ. पवार यांच्याकडे सदर अपघाताची (Accident) सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा (Punishment) करावी अशी मागणी केली आहे.