परीक्षा शुल्क परत देणार का?

पॅरेंटस् असोसिएशनचा सवाल
परीक्षा शुल्क परत देणार का?

नविन नाशिक । प्रतिनिधी

नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आणि आता अंतर्गत मूल्यमापनाच्या सहाय्याने त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी निकष ठरविण्याची कार्यपद्धती ठरविण्यात येत आहे .

त्यामुळे यंदा लेखी परीक्षा होणार नसून, पर्यवेक्षकांना मानधन, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अतिरिक्त साहित्य, भरारी पथकांचा खर्च, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचा मुद्रण खर्च असा खर्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला येणार नसल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षाच रद्द झाल्या आहेत तर दहावीच्या विद्याथ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना परत देणार का असा सवाल नाशिक पॅरेंटस असोसिएशनच्या वतीने मंडळाला केला आहे .

यंदा नाशिक शिक्षण मंडळाचे तब्बल 2 लाख 1675 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून राज्य शिक्षण मंडळ 415 रुपये परीक्षा शुल्क घेते तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला 395 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 415 रुपये या प्रमाणे मंडळाकडे जवळपास 8,36,95125 हजार शुल्क यंदा जमा झाले. नाशिक मंडळातून यंदा दहावीच्या परीक्षेसाठी नियमित 2 लाख 1675 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

या सगळ्यांचे 415 प्रमाणे तब्बल 8 कोटी तसेच पुनर्परीक्षार्थी विद्याथ्यांचे वेगळे असे तब्बल जवळपास 50 लाख रुपयांचे परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा झाले . परीक्षा तर रद्द झाली आहे. आता अंतर्गत मूल्यमापनाच्या निकषावर निकाल लागणार असल्याने साहजिकच आहे त्याला मंडळाकडून केल्या जाणार्‍या नियोजनावर मानधन आणि मुद्रणासाठी लागणारा खर्च निश्चितच होणार नाही .

मग गोळा झालेली शुल्काचे शिक्षण मंडळ करणार काय? ते शुल्क शाळांच्या माध्यमातुन परत करणार काय? हे मंडळाने स्पष्ट करावे ,अन्यथा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील आर्थिक परिस्थिती, परीक्षा रद्दचा निर्णय निर्णय लक्षात घेऊन विद्यर्थ्यांना परीक्षा शुल्क परत करावे.

परीक्षा शुल्काच काय स्पष्ट करा

नाशिक शहरातील काही शाळांनी नाशिक शिक्षण मंडळाचे धाब्यावर बसवत मंडळाच्या शुल्का व्यतिरिक्त जास्त शुल्क घेतले आहे ,परीक्षा रद्द झाल्या आहेत तर ते शुल्काच पुढे काय ते स्पष्ट करावे अन्यथा परत करा.

- निलेश साळुंखे शिवसेना, विभागप्रमुख तथा अध्यक्ष नाशिक पॅरेंटस् असोसिएशन

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com