मराठी साहित्य संमेलनासाठी वैयक्तिक मदत करणार : खा.गोडसे

मराठी साहित्य संमेलनासाठी वैयक्तिक मदत करणार : खा.गोडसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून नाशिककरांना आपल्या आवडत्या लेखकांच्या भेटी घेता येतील. सर्व नाशिककर संमेलनात सहभागी होतील, असा विश्वास खा. हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला. या साहित्य संमेलनाला आपण वैयक्तिकरीत्या मदत करू, असेही ते म्हणाले.

साहित्य संमेलनाचे निमंत्रण स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लोकहितवादी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी, संमेलनाचे कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे, संजय करंजकर, नाटककार भगवान हिरे हे उपस्थित होते.

खा.गोडसे म्हणाले, पुस्तके पाहता येतील. ग्रंथनिर्मिती ही ज्ञाननिर्मिती असते. नाशिकमध्ये वाचनसंस्कृती विकसित झाली आहे. त्यामुळे ग्रंथविक्री या संमेलनातून मोठ्या प्रमाणात होईल. तसेच साहित्य संमेलनातील कार्यक्रमातून लोकांचे प्रबोधन होईल आणि आनंद घेता येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com