एसटीला गतवैभव देणार: भुसे

एसटीला गतवैभव देणार: भुसे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

एस.टी. बस (ST Bus) सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे मुख्य साधन आहे. त्याअनुषंगाने एसटी महामंडळाच्या (ST Corporation) माध्यमातू

प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहे. महामंडळाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी केले.

मालेगाव (malegaon) आगारासाठी सोयीसुविधा युक्त तीन नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. पालकमंत्री भुसे यांनी या बसेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांचे लोकार्पण केले यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, वाहतूक अधीक्षक दादाजी महाजन, आगार प्रमुख किरण धनवटे, प्रमोद पाटील, सुनील चांगरे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मालेगाव बसस्थानकाला (Malegaon Bus Stand) नवीन बस उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे आभार मानत भुसे पुढे म्हणाले, मालेगाव आगारासाठी सोयीसुविधायुक्त एकूण 10 नवीन बसेस उपलब्ध होणार आहे. यापैकी 3 बसेस आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. या तीन नवीन बसेस मालेगाव-नाशिक (malegaon-nashik) या मार्गावर धावणार असून या अत्याधुनिक नवीन बसेसचा (new buses) लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शासनाने नेहमीच परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने कर्मचार्‍यांनीही उपलब्ध होणार्‍या बसेस चांगल्या पद्धतीने वापरुन शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे. एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार व मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु असून प्रवासीही त्याचा लाभ घेत आहेत.

येणार्‍या काळात नवीन बसेसची संख्या आणखी वाढविण्यात येणार असून इलेक्ट्रॉनिक बसेसही टप्याटप्याने सुरु करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी पुढे बोलतांना सांगितले. मालेगाव बसस्थानकात प्रवाशांसाठी अजून काही आवश्यक अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करतांना विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या फेर्‍या वाढविण्याबरोबर प्रवाशांना आरामदायक व सुरक्षित लांबपल्ल्याचा प्रवास करण्यासाठी नवीन पद्धतीच्या बसेस उपलब्ध होणार आहे. त्यादृष्टीने नवीन पद्धतीने काम महामंडळ करत असल्याचे सांगितले. मालेगाव आगाराचे प्रमुख किरण धनवटे यांनी एसटी महामंडळात येणार्‍या नवीन बसेसबद्दल व सोयीसुविधेबद्दल सविस्तर माहिती यावेळी दिली. कार्यक्रमास अधिकारी, वाहक, चालक, सेवक यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com