ग्रीन कॉरीडॉरसाठी शेतकर्‍यांना न्याय देणार: झिरवाळ

ग्रीन कॉरीडॉरसाठी शेतकर्‍यांना न्याय देणार: झिरवाळ

ओझे / ननाशी । वार्ताहर Ozhe / Nanashi

प्रास्तावित चेन्नई-सुरत ग्रीन कॉरीडॉर एक्सप्रेस हायवे (Chennai-Surat Green Corridor Express Highway) साठी शेतकर्‍यांच्या (farmers) जमिनी अधिग्रहीत (Land acquired) करण्याबाबतचे राजपत्र (Gazette) दि.1 नोव्हेंबर रोजी विवीध दैनिकांमधुन प्रसिद्धीस देण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला.

त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे व प्रशासन- शेतकरी यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal) यांनी दिंडोरी (dindori), पेठ (peth) व सुरगाणा (surgana) तालुक्याच्या सिमावर्ती ठिकाणी चिकाडी ता. दिंडोरी येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तिन्ही तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण केले जाणार मात्र त्याचा मोबदला कसा असेल याबाबत संभ्रमात होते.

राजपत्रात प्रसिद्धी दिनांकानंतर हरकती नोंदवण्याचा अधिकार शेतकर्यांना दिला असुन ज्या शेतकर्‍यांच्या काही हरकती असल्यास त्या शासनास अवगत करण्या संदर्भात यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांना अधिकाधिक मोबदला मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिले.

आमदार नितीन पवार (mla nitin pawar) म्हणाले की, शेतकर्‍यांच्या जमिनी हायवे साठी अधिग्राहित होणार असल्यामुळे त्यांच्या होणार्‍या नुकसाना बद्दल शासन स्तरावर योग्य ती दखल घेऊन शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ असे आमदार नितीन पवार म्हणाले. नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाचे तांत्रिक प्रबंधक दिलीप पाटील (Dilip Patil, Technical Manager, National Highway Authority of India) यांनी ग्रिन कॉरीडॉरचे फायदे विषद करतांना परिसराचा होणारा विकास व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असुन शास्वत विकासास चालना मिळून दक्षिण ते पश्चिम भारतातील संस्कृतीची जोडणी होऊन पर्यटनास (Tourism) मोठा वाव असल्याचे म्हणाले.

यावेळी वनजमिनी धारकांना शासन कसा मोबदला मिळवून देणार असा प्रश्न पश्चिम भागातील शेतकर्यांनी उपस्थित केला. बैठकीस कोचरगाव गटाचे जिप सदस्य अशोक टोंगारे, सुरगाणा पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित, माजी पंचायत समिती सदस्य गोपिनाथ पाटील, सुरगाणा नायब तहसिलदार भोसले, वन परिक्षेत्रचे एम. बी. पाटील,

सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती उत्तम कडू , पिंपळनारेचे सामाजिक कार्यकर्ते राजू खांदवे, रासेगावचे युवा शेतकरी किशोर ढगे, गांडोळेचे सरपंच भरत भोये, सुनिल भौये, युवराज लोखडे, काशीराम चौधरी, पोलिस पाटील हर्षदा भोये, धनराज भोये, सुरेश भोये आदीसह बाधीत क्षेत्राचे सर्व महसुल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी कृषी विभागाचे अधिकारी, जलसिंचनचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बाधित शेतकर्‍यांनी एकत्र येत कमिटी स्थापन करून आपल्या हरकती शासनास कळविणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com