जुनी पेन्शन मिळवून देऊ : खांडेकर

जुनी पेन्शन मिळवून देऊ : खांडेकर

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

महाराष्ट्र राज्यातील Maharashtra State सर्व विभागातील कर्मचारी आणि इतर सर्व संघटना यांनी संघर्ष यात्रा निमित्ताने बांधलेली वज्रमूठ 2005 नंतरच्या सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन old pension मिळवून देईल असा आत्मविश्वास पेन्शन संघर्ष समितीचे Pension Struggle Committee राज्य समन्वयक वितेश खांडेकर Vitesh Khandekar यांनी व्यक्त केला.

दिंडोरी येथे संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन परिषदेत बोलत होते. व्यासपीठावर नाशिक पदवीधर शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे व राज्यातील सर्व शिक्षक, इतर कर्मचारी संघटनांचे राज्य प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. खांडेकर पुढे म्हणाले की, कर्मचार्‍यांच्या म्हातारपनी मिळणारी पेन्शन राज्यकर्ते यांनी हिरावून घेतली. आज एखाद्या कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याचे कुटूंब रस्त्यावर येईल, त्याला आपण जबाबदार रहाणार आहोत. त्यामुळे राज्यकर्ते यांना जेरीस आणून आपण जुनी पेन्शन लागू करायला भाग पाडू, त्यासाठी कितीही यातना, आंदोलन, मोर्चे, उपोषण करायला लागले तरी हा कर्मचारी वर्ग आता मागे हटणार नाही.

नाशिक जिल्ह्यातील शिक्षण चळवळ राज्याला प्रेरणा देणारी आहे. राज्याला मार्गदर्शक ठरेल असा दैदिप्यमान परिषद आयोजित करून जिल्हातील कर्मचारी यांची एकजूट निर्माण केली हे नक्कीच कौतुकास्पद आहे. वेळ आली तर हा कर्मचारी राज्यकर्ते यांना रस्त्यावर फिरणे बंद करेल, शासनाला जुनी पेन्शन लागू करायला भाग पाडेल हा दिवस आता दूर नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून शासन दरबारी प्रसंगी लढा उभारू असे आश्वासन दिले.

यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे, शिक्षक समितीचे राज्य नेते काळूजी बोरसे, शिक्षण परिषदेचे राज्य कार्यवाहक संजय पगार, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे, विश्वस्त नदीम पटेल, महिला प्रतिनिधी दीपिका एरंडे, सल्लागार सुनील दुधे, भागवत धूम, शिक्षक भारतीचे राज्य सरचिटणीस भरत शेलार, मधुकर काठोळे, मिलिंद सोळंकी, शैलेश भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन वडजे यांनी केले. स्वागत राज्य मुख्य समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी केले तर आभार दिगंबर बादाड यांनी मानले. यावेळी जिल्हा कार्यकारणी आणि सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com