जि.प.च्या दोन - तीन जागांवरच आरक्षण मिळणार?

जि.प.च्या दोन - तीन जागांवरच आरक्षण मिळणार?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ( Local Body Government )50 टक्कयांच्या मर्यादेत ओबीसींच्या आरक्षणाला( OBC's Political Reservation ) सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मान्यता दिली आहे.या निर्णयाचे ओबीसींसाठी लढणार्‍या राजकीय व बिगर राजकीय संघटना व त्यांच्या नेत्यांकडून एकीकडे जल्लोषात स्वागत केले जात असले तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या ( Zilla Parishad Elections )दृष्टीने या निकालाकडे पहायचे म्हटले तर ओबीसी प्रवर्गाची ‘डोंगर पोखरून उंदिर निघाला’ अशी अवस्था झाली आहे.

कारण जिल्हा परिषदेत ओबीसींना नाशिक जिल्ह्यात केवळ तीन टक्के आरक्षण मिळणार असून एकूण 84 जागां (गट) पैकी दोन अथवा तीन जागाच आरक्षित होतील, अशी स्थिती होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण बहाल करत पंधरा दिवसांतच निवडणूक जाहीर करा, असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण सोडतीचा स्थगित केलेला कार्यक्रम आता नव्याने लवकरच जाहीर करावा लागणार आहे.

नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीत 50 टक्कयांच्या मर्यादेत आरक्षणाचा विचार केला तर ओबीसींना अवघे तीन टक्के आरक्षण मिळणार,अशी शक्यता आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 39.91 टक्के असून 7.14 टक्के अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

या दोन्ही प्रवर्गांना लोकसंख्येच्या प्रमाणात 47 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. यामुळे ओबीसींना केवळ तीन टक्के आरक्षण शिल्लक राहत आहेत. मागील म्हणजे 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत 27 टक्कयाच्या नियमानुसार 73 पैकी 20 जागांवर ओबीसींना आरक्षण होते.

यावेळी केवळ तीन टक्के आरक्षण असल्याने दोन अथवा तीन जागा ओबीसींसाठी आरक्षित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी कार्यकर्ते, नेते यांच्याकडून सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत असला, तरी आदिवासीची संख्या अधिक असलेल्या नाशिकसारख्या जिल्ह्यांला ओबीसींना या निर्णयाचा मात्र फारसा राजकीय फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे.

2017 चे जि.प. आरक्षण

प्रवर्ग-आरक्षित गट

अनु. जमाती-29

अनु. जाती-5

ओबीसी-20

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com