रेल्वे थांबे पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करणार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
रेल्वे थांबे पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करणार

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

करोनाचा ( corona )संसर्ग कमी होताच नांदगाव स्थानकावर ( Nandgaon Railway Station ) पूर्ववत रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी आपण रेल्वे मंत्र्यालयाला विनंती करणार आहोत. सर्व एक्स्प्रेस नांदगावला थांबाव्यात यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करत असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar ) यांनी येथे बोलताना दिली.

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त ( Jan Aasharivad Yatra )आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांचे नांदगावी आगमन झाल्याने त्यांचे शहरवासियांतर्फे उत्स्फूर्त स्वागत केले गेले. येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पवार बोलत होत्या.

देशात करोनाचे प्रमाण कमी झालेले नाही. अजूनही करोनाच्या स्पेशल रेल्वेगाड्या चालू आहेत. राज्यामध्ये रेल्वेगाड्या चालू करायच्या असतात किंवा तिला थांबा द्यायचा असतो तिथेसुद्धा राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. रेल्वेला थांबा देत असताना तिथली सुरक्षा, आरोग्याची काळजी आणि करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काही प्रोटोकॉल असतात हे लक्षात घेतले पाहिजे, असे स्पष्ट करत डॉ. पवार म्हणाल्या, नांदगाव रेल्वेस्थानकावर रद्द झालेले थांबे पूर्ववत करण्यासाठी आपण रेल्वेमंत्र्यांना निवेदने दिले आहे. करोना नियंत्रणात येताच रेल्वेचे थांबे पूर्ववत व्हावेत यासाठी आपला पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये पहिली महिला खासदार म्हणून जो विश्वास टाकला त्याच्यामध्ये नांदगावचा मोठा वाटा होता. दोन लाख लीड देताना नांदगावकर कुठे कमी पडले नाही हेसुद्धा सदैव आपल्या स्मरणात राहणार असल्याचे डॉ. पवार यांनी शेवटी बोलताना सांगितले. व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ नेत्या जयश्री पवार, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बनकर, डॉ. पुष्कर निकम, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, राजेंद्र पवार, संजय सानप, राजीव धामणे, शहराध्यक्ष उमेश उगले, भावराव निकम, बापू जाधव आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com