अमृत योजनेतून निधीसाठी पाठपुरावा करणार- मनपा आयुक्त

आयमा शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन
अमृत योजनेतून निधीसाठी पाठपुरावा करणार- मनपा आयुक्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील ( Ambad & Satpur Industrial Area) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मलजल व्यवस्थापनाचा (sewage management) प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी पुढाकार घेतला असून, एमआयडीसीमार्फत कोणकोणत्या भागात मलजल वाहिका टाकण्याची गरज आहे, त्यावर प्रक्रिया करणारे एसटीपी यासह एकूण खर्चासंदर्भात डीपीआर पाठवल्यास केंद्राच्या अमृत योजनेतून ( Amrut Yojana )निधी मिळवण्यासाठी मनपाद्वारे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आयमा ( AIMA )शिष्टमंडळाला दिले.

शहरातील औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याची प्रक्रियासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. अंबड व सातपूर अशा दोन औद्योगिक वसाहत असून येथील रस्ते, पथदीप यापूर्वीच देखभालीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित झालेले आहे. मात्र, सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा मुद्दा वादातीत आहे. उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठीच्या ङ्गजिल्हा उद्योगमित्रफ( झूम)च्या बैठकीत अनेक वेळी सांडपाणी प्रक्रियेचा मुद्दा चर्चत आला होता. मलजल वाहिका टाकण्याचा खर्च नाशिक महापालिकेने करावा की एमआयडीसीने करावा याबाबत तोडगा निघू न शक्लयाने प्रश्न प्रलंबीत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

मनपा व एमआयडीसी वादात हा प्रश्न सुटत नसल्याने आयमा पदाधिकार्यांनी आयुक्त पवार यांची भेट घेत, मलजलवाहिकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. मात्र एमआयडीसी हे स्वतंत्र प्राधिकरण असल्यामुळे तसेच पालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या प्रकल्पासाठीचा 'डीपीआर' तयार करून पाठवल्यास महानगरपालिका पाठपुरावा करून तो केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून राष्ट्रीय नदीसंवर्धन कायद्यांतर्गत निधी मिळवण्यासाठी पाठवेल, असे आश्वासन पवार यांनी आयमा शिष्टमंडळाला दिले. यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बुब, योगिता आहेर, राजेंद्र अहिरे,आयमा विश्वस्त समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे आदी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com