नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

सर्व शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांत प्रत्यक्ष वर्ग भरवण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच महाविद्यालये उघडण्यासंदर्भात चर्चा केली.

या बाबतचा निर्णय घेण्यासाठी सर्व कुलगुरूंची बैठक बोलावली आहे. त्यात कॉलेजांचे वर्ग भरवण्यासंदर्भात सविस्तर करण्यात येईल. त्यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांत घेतला जाणार आहे.

‘महाविद्यालये उघडण्यासंदर्भात आमची तयारी आहे. मात्र राज्य सरकार निर्णयच घेत नाही. आपण कुलपती या नात्याने हस्तक्षेप करावा’, असा आग्रह सर्व कुलगुरूंनी राज्यपाल यांच्याकडे केला होता. तरी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय होत नव्हता. मात्र आता एक ते दाेन आठवड्यात महाविद्यालयीन वर्ग भरवले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात सार्वजनिक व खासगी अशी एकूण ६२ विद्यापीठे आहेत. त्याच्या अधिपत्याखाली चार लाख ५७१ कॉलेजे असून, दोन हजार २६२ स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ४२ लाख ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांची संख्या १ लाख ५८ हजार इतकी आहे.