पुन्हा शिर्डी मतदारसंघातून लढणार: खा.आठवले

पुन्हा शिर्डी मतदारसंघातून लढणार: खा.आठवले

संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner

शिर्डी लोकसभा निवडणुकीत (Shirdi Lok Sabha Election) पराभूत झालेले सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister of State for Social Justice Ramdas Athawale) यांनी आगामी लोकसभा निवडणूक (Sabha Election) पुन्हा शिर्डी मतदार संघातून (Shirdi constituency) लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तालुक्यातील दुर्गम भोजदरी गावात विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आठवले यांनी आपल्या जोरदार फटकेबाजी करुन उपस्थित कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या. आमचे आणि मुख्यमंत्र्यांचे सध्या पटत नसले तरी आपण कामासाठी आता पटवून घेवू असे त्यांनी सुतोवाच यावेळी केले.

ना. आठवले हे सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) सामाजिक न्याय राज्यमंत्री (Minister of State for Social Justice) म्हणून काम पाहत आहेत. आठवले यांनी सहकुटुंब गावात येवून ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनी पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक (election) लढवण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली.

काँग्रेसच्या (congress) तिकिटावर याच मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. याचे शल्य त्यांनाही आज आहे. भाजपा (bjp) की रिपब्लिकन पक्ष (Republican Party) स्वतंत्र निवडणूक लढविणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. लोकसभा निवडणुकांच्या वेळी रामदास आठवले हे काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सोबत होते. या निवडणुकीत रामदास आठवले (Ramdas Athavle) यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर त्यांनी या पराभवाचं खापर नगर जिल्ह्यातील काही बड्या काँग्रेसच्या नेत्यांवर फोडलं होतं.

तत्कालीन काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Congress leader Radhakrishna Vikhe-Patil) यांना रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी जबाबदार धरले होते. शिर्डीमधून मला आपल्याच नेत्यांनी पराभूत केल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. आता ना. आठवले भाजपासोबत आहेत. विखे पाटीलसुध्दा आता भाजपामध्ये आहेत. यापूर्वी एका कार्यक्रमात रामदास आठवले यांनी आता मला शिर्डीत मदत कराल ना? असा गमतीने प्रश्न विचारला होता. आठवले आता पुन्हा शिर्डीच्या वाटेवर जाण्याच्या विचारात असल्याचे यामुळे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com