मोठी सामाजिक शक्ती उभी करणार : बोधी

बुद्धविहारच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप
मोठी सामाजिक शक्ती उभी करणार : बोधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बुद्धविहार समन्वय समिती Buddha Vihar Coordinating Committee ही बौद्धांची शिखर संस्था व्हावी, हे अराजकीय सेंटर असले व राजकरणात प्रत्यक्ष उतरणार नसले तरी राजकारण दुर्लक्षितही करणार नाही. वाट चुकलेल्यांंना सरळ मार्गावर आणण्याचे काम या संंस्थेच्या माध्यमातून होईले. बुद्धविहारांंचे सक्षम नेटवर्क उभे करुन एक मोठी सामाजिक शक्ती उभी करण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी करू. असा ठाम विश्वास बुद्धविहार समन्वय समितीचे संस्थापक व मुुख्य संयोजक अशोक सरस्वती बोधी Ashok Sarasvati Bodhi यांनी बुद्धविहारांचे राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी व्यक्त केला.

भारतातील बौद्ध राजा प्रिय सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर शासकीय पद्धतीने साजरी व्हावी, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, 14 ऑक्टोबर 1956 नंतर बौद्धविहारांच्या निर्मितीसाठी नाममात्र दरानेे शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, असे महत्त्वाचे ठरावही यावेळी करण्यात आले.

आजच्या सत्रात बौद्ध लेणीयोका महत्त्व एवं संवर्धन यावर चर्चा झाली. आंबेडकरी विचारवंत बबन चहांदे अध्यक्षस्थानी होते. सागर कांबळे, प्रा. अतुल भोसेकर, डॉ. जितेंद्र कुमार यात सहभागी होते. खुले अधिवेशन दुपारी झाले. भिख्खु विनय बोधीप्रीय अध्यक्षस्थानी होते.

अभयरत्न बौद्ध, फनसुक लडाखी, नंदकिशोर साळवे, अशोक बोधी, उमेश पठाऱे, मुख्य अतीथी होते. बुद्ध भीमगीत गायनाने समारोप झाला.अधिवेशन यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप गोसावी, मुख्य आयोजक उमेश पठारे बबन चहांदे, अ‍ॅड. प्रदीप गोसावी, कुणाल गायकवाड, किशोर शिंदे, राजेश गांगुर्डे, शामकुमार मोरे, किरण गरुड, रुपाली जाधव, उल्हास फुलझेले, दिलीप रंगारी, भरत तेजाळे, मोहन अढांगळे आदींसह 21 समित्यांचे शंभर कार्यकर्ते प्रयत्नशील होते. 15 राज्यांतील दोनशे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुढील अधिवेशन सांगली येथे घेण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.

महत्त्वाचे ठराव

पुरातत्व विभागने घोषित केललेे बौद्ध अवशेष लेणी स्तुप, विहार, बुद्ध व संबंंधित मूर्ती शिलालेख यांंचे रक्षण व्हावे, बुद्ध गया व बुद्धविहार हे तमाम बौद्धांंचे पवित्रस्थळ आहे. त्यांच्या देखभालीसाठी बौद्ध व्यक्तीची नियुक्ती करावी, बर्‍याच वर्षांपासून ही मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. आता याची गंभीर दखल घेऊन त्यावर तातडीने निर्णय व्हावा, इतरांकडून जे अतिक्रमण होत आहे त्याला आळा घालावा. भारतातील बौद्ध राजा प्रिय सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर शासकीय पद्धतीने साजरी व्हावी, त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, 14 ऑक्टोबर 1956 नंतर बौद्धविहारांच्या निर्मितीसाठी नाममात्र दरानेे शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, पाली भाषा अडीच हजार वर्षे जुनी आहे. तिच्या पुनरुज्जीवन व प्रचार, प्रसारासाठी पाली विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करावे, बौद्ध पाली विद्यापीठाची निर्मिती करावी, संविधनाच्या आठव्या सूचित पाली भाषेचा समावेश करावा, असे महत्त्वाचे ठराव करण्यात आले.

सक्षम नेटवर्क उभे करणार

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी धार्मिक कार्यासाठी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या घटनेतील कलम 3 मध्ये नमुद केलेल्या दहा उद्दिष्टांची अंमलबजावणी करणे हा बुद्धविहार समन्वय समितीचा मुख्य उद्देेश आहे. आतापयर्ंंत पंधरा राज्यांत अभियानास प्रारंंभ झाला आहे. बुद्धविहारांचा समन्वय म्हणजे बौद्धांचा समन्वय आहे. बौद्ध संस्कृती आणि संंस्कार रुजवणे बौद्ध लेण्यांचे संंरक्षण व संवर्धन करणे, पाली भाषेचा प्रचार, प्रसार करणे असे अनेक उपक्रम या विहारातून होऊ शकतात. यापुढे प्रत्येक बुद्धविहार हे सेवाधर्माशी जोडले जाणार आहे.

एक लाख बुद्धविहारंच्या माध्यमातून जमा होणार निधी समाजातील गरीब घटकांचे उत्थान व विहारंचे दुरुस्तीसाठी खर्च केला जाणार आहे. बुद्धविहार संस्कृती निर्माण होण्यासाठी बुद्धविहारांमध्ये समन्वय असणे महत्त्वाचे आहे. बुद्धविहार हे बौध्द संघटनांचे आणि विविध राजकीय पक्षांमध्ये विखुरलेल्या बौद्धांचे श्रध्दास्थान व शक्तीस्थळ असते. बुद्धविहार हे धम्म संस्कृतीचे केंद्र म्हणून सुस्थापित होणे काळाची गरज आहे. देशभरातील बुद्धविहारांंचे सक्षम नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. बुद्धविहारांच्या समन्वयानेे बौद्धांची निर्विवाद शिखर संंस्था निर्माण होईल, असा विश्वास आहे. दरवर्षी अशा प्रकारे अधिवेशन विविध शहरांत घेऊन जागृती केली जाणार आहे. जसे इतर धर्मियांचे शक्तीस्थळे त्यांची धार्मिक स्थळे आहेत. त्याचप्रमाणेे बुद्धविहारांंचे सक्षम नेटवर्क उभे करून एक मोठी सामाजिक शक्ती उभी करण्याचा प्रयत्न आहे, असे अशोक बोधी यांंनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com