आदिवासींना विकासात आणणार: आ. पवार

नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचा सत्कार
आदिवासींना विकासात आणणार: आ. पवार

सुरगाणा । प्रतिनिधी | Surgana

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) आदिवासी बांधव (tribal community) अजूनही विकासापासून वंचित आहेत.

त्यांचा किमान पन्नास टक्के विकास झाल्याशिवाय आपण डोक्यावर फेटा बांंधणार नाही, असे प्रतिपादन आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी केले. सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) मोहपाडा येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार व पक्ष प्रवेश सोहळ्यात आ. पवार बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित (NCP Taluka President Chintaman Gavit), युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार (Youth Congress Taluka President Rajendra Pawar), गोपाळराव धुम, माजी सभापती सुवर्णा गांगुर्डे, संतोष देशमुख, नवसू गायकवाड, मोहपाडा सरपंच शांताबाई पवार, काळू बागुल, तुकाराम देशमुख, तुळशीराम महाले, केळीपाडा येथील दिपक मेघा, नारायण गावित, सुनिता वाघ, पंकज रामदास केंगा, जोतिंग बागुल आदी उपस्थित होते.

यावेळी आ. नितीन पवार म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूकीत (election) काहीना अपयश आले असले तरी युवकांनी अपयशाने खचून न जाता गावपातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बुथ निहाय पक्ष बांधणी करुन कामाला लागावे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच पुंडलिक पवार (शिंदे), अनिता पवार (रोकडपाडा), राजेंद्र (डोल्हारे), आनदा झिरवाळ खुंटविहीर, संगिता देशमुख (म्हैसखडक), कावेरी गुंबाडे (रोंघाणे),

पुंडलिक घांगळी (हेमाडपाडा), पुंडलिक बागुल (हस्ते), मिरा महाले (राष्ट्रवादी), मजित चौधरी (कुकूडणे), काशीराम गायकवाड (साजोळे), अशोक गवळी (बोरगाव), पुंडलिक पवार (शिंदे), कौशल्या चव्हाण (हरणटेकडी), रंजना देशमुख (वाघधोंड), योगेश ठाकरे (मालगव्हाण) आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

सरपंचानी दारुबंदी करावी

तंबाखू, मसेरी, दारू, गुटखा, हि व्यसने सोडा, व्यसनापासून दुर रहा,नवीन सरपंचानी शंभर टक्के दारू बंदी करावी, अपघातात तरुण मुले हकनाक मरत आहेत. त्यांना समज द्या. बोरगावची हातभटीची दारू दळवटला येते ती बंद केली , असे आ. नितीन पवार यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com