भाजप मनसे युती होणार ?

राज ठाकरे ,चंद्रकांत पाटील यांच्या एकाच वेळी नाशिक भेटीमुळे चर्चेला उधाण
भाजप मनसे युती होणार ?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीनंतर राजकीय दौऱ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांचे आज ( दि. 16 ) नाशिक मध्ये आगमन झाले मात्र ( दि. 17 ) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil )हे देखील नाशिक मध्ये असल्यामुळे मनसे आणि भाजप युतीचे हेच संकेत तर नाही ना ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे आज पासून राजकीय दौर्‍यावर नाशिकमध्ये आहेत.गेल्या काही महिन्यांपूर्वी ते एका खासगी लग्नसमारंभासाठी नाशिक मध्ये येऊन गेले.

दरम्यान यंदाच्या दौऱ्यात ते पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. मात्र याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील नाशकात असल्यामुळे आगामी काळात भाजप आणि मनसे युती होईल का ? या चर्चेला उधाण आले आहे.

याच मात्र असं आहे की, सातपूर प्रभाग सभापती पदी निवड होण्याकरिता भाजपने मनसेला पाठिंबा दिला असल्याने या पार्श्वभूमीवर ही चर्चा आता सुरू आहे. दरम्यान राज ठाकरे यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक,जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इचम, जिल्हाध्यक्ष आनंदा सूर्यवंशी, नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे, शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com