चार महिने आधी होणार ‘अग्रीम पार्सल’ बुकिंग

पार्सल गाडी
पार्सल गाडी

नाशिकरोड । Nashikroad

रेल प्रशासनद्वारे व्यापारी, व्यावसायिकांच्या सुविधेसाठी विशेष यात्री गाडी तथा विशेष पार्सल गाडीचे एसएलआर आणि पार्सलयानमध्ये आपल्या पार्सलची जागा १२० दिवस अग्रीममध्ये आरक्षित करण्याची सेवा सुरू केली आहे.

या योजने अंतर्गत व्यापारी आपले पार्सल पाठवण्यासाठी 120 आधी स्थान आरक्षित करू शकता. या सुविधे अंतर्गत वहन करण्यासाठी लागणारे अपेक्षित पूर्ण पार्सल भाड्याच्या 10 टक्के रक्कम भरून आरक्षित करता येणार आहे.

बाकी ९० टक्के पार्सल भाडे गाडीच्या निर्धारित सुटण्याच्या ७२ तास अगोदर भरावे लागणार आहे. जर ग्राहक गाडीच्या निर्धारित सुटण्याच्या ७२ तासांपूर्वी उरलेले पार्सल भाडे भरू शकला नाही तर पार्सलची अग्रिम बुकिंग रद्द करण्यात येईल आणि अग्रिम पार्सल भाडे भरलेले 10 टक्के जप्त केले जाईल.

याच प्रकारे, विशेष यात्री गाड़ी तथा विशेष पार्सल गाड़ीमध्ये मागणीनुसार पार्सलयानची बुकिंग पण 120 दिवस अगोदर बुक करता येणार आहे. याकरिता वैगन पंजीकरण शुल्क भरावे लागणार आहे.

व्यावसायिक व शेतकर्‍यांनी रेल्वेच्या या नव्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि रेल्वे द्वारे पार्सल बुकिंग करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com