बेरोजगार कामगारांच्या रक्षणासाठी सदैव पाठीशी उभे राहणार : शरद बोडके

बेरोजगार कामगारांच्या रक्षणासाठी सदैव पाठीशी उभे राहणार : शरद बोडके

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आदिवासी समाजातील भटक्या, बेरोजगार कामगारांच्या रक्षणासाठी नाशिक जिल्ह्य काॅंग्रेस व्हिजेएनटी विभाग पाठीशी उभा राहील, असे आश्वासन जिल्हा अध्यक्ष शरद बोडके यांनी दिले...

नाशिक जिल्ह्यात काॅंग्रेस व्हिजेएनटी विभागाच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त शहरात ठिकठिकाणी प्रवेश सोहळा, शाखा उद्घाटन, जयंती उत्सव व वाहन रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन शरद बोडके यांनी केले होते. उद्घाटन काॅंग्रेस व्हिजेएनटी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष नाथ यांनी केले. पेठ नाका येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

पंचवटी कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराज व शालीमार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तींना हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर बोडके यांच्या नेतृत्वाखाली गणेश दरोडे, सुनील वाघले, सुनील गायकवाड, अजय इंगळे,  लोतीश वाघले, आनंदा दरोडे, नवनाथ जाधव, जयेश दरोडे, मोहन दरोडे, राजेंद्र जाधव, जनार्दन दरोडे, विष्णू निंबारे, चेतन जाधव, मनोहर दरोडे,  रोशन दरोडे, गुलाब दरोडे, बाळू दरोडे, तुषार दरोडे, अतुल दुगल, महेंद्र जाधव, अभिनाथ दरोडे, विशाल वाघले, कृष्णा दरोडे, महेश दरोडे आदींनी कार्यकर्त्यांसह काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला.

 पेठ नाका, गंगापूर नाका, त्र्यंबक नाका, सातपुर, सिटी सेंटर माॅल, इंदिरा नगर, मुंबई नाका, व्दारका, जुना आडगाव नाका व नवीन आडगाव नाका येथे संतोष नाथ यांच्या हस्ते शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

नाशिक शहरात तालुक्यातून अनेक आदिवासी कामगार रोजगाराच्या शोधासाठी येत असतात, त्यांच्या कडुन अनेक ठेकेदारांकडून कामे करून घेतली जातात.परंतु, वेतन देताना त्यांना दमदाटी करून डांबण्यात येते, तर कधी स्थानिकांकडून खंडणी मागितली जाते.

या सर्व त्रासाची माहिती त्यांनी आम्हाला दिली व काॅंग्रेस नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, व्हिजेएनटी प्रदेश अध्यक्ष मदन जाधव व प्रदेश उपाध्यक्ष संतोष नाथ यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस पक्षात काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला, असे बोडके यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com