रानभाज्या महोत्सव उद्यापासून

रानभाज्या महोत्सव उद्यापासून

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा (nashik district) ग्रामीण विकास यंत्रणेच्या (rural development machinery) महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत

पंचायत समितीच्या (panchayat samiti) आवारात यावर्षीही रानभाज्या महोत्सवाचे आयोजन (wild veggies festival) करण्यात आले आहे.बुधवारी (दि.27) सकाळी 10 विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांची (wild veggies) ओळख व्हावी, या उद्देशाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक आठवड्यात रानभाज्या विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (District Council Chief Executive Officer Leena Bansod) यांनी दिली.

उमेद (एम एस आर एल एम) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (Maharashtra State Rural Life Promotion Campaign) नाशिक जिल्ह्यात (nashik district) महिलांच्या सक्षमीकरण (women empowerment) व जीवनोन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरिबातील गरीब महिलांचे संघटन करून त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण कशा होतील व त्यांची कायमस्वरूपी उपजीविकेत वृद्धी कशी निर्माण होईल, यावर महाराष्ट्र राज्यात (Maharashtra State) व नाशिक जिल्ह्यात कार्य सुरू आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रानभाज्या महोत्सव राबविला जातो.

आदिवासी भागातील गरीब महिला पावसाळ्यात (monsoon) रानात जाऊन रानभाज्या गोळा करतात. या राभाज्यांचे आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषवर्धक असे अनेक फायदे आहेत. पावसाळा सुरवात झाली की, रानात, माळावर रानभाज्या उगवायला सुरवात होते. आदिवासी महिला (tribal woman) भर पावसात जाऊन या रानभाज्या गोळा करतात. या रानभाज्या खायला अतिशय पौष्टिक, आरोग्य वर्धक व बहुगुणी आहेत. यात कार्बोहायड्रेट (Carbohydrate), प्रोटीन (protein), सापोजेनिन, सॅपोनिन, सोडियन सोडियम पोटॅशियम, कॅल्शियम असते. या रानभाज्यांची शहरी भागातील नागरिकांना ओळख व्हावी व बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळावे या उददेशाने उमेद - अभियानामार्फत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

नाशिक पंचायत समिती (Nashik Panchayat Samiti) आवारात तीन महिने हा रानभाज्या महोत्सव राबविण्यात येणार असून दर शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत पावसाळयातील रानभाज्या विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी दिली. रानभाज्या महोत्सवानंतरही महिला स्वय्ंसहयता गटांना दिवाळीपर्यत येणा-या विविध सणांसाठीच्या वस्तु विक्री करण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

दरम्यान, रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हाधिकारी गंगाधरण डी., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे,गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी -विनोद मेढे,जिल्हा अभियान व्यवस्थापक - बंडू कासारआदी उपस्थित राहणार आहेत. नाशिक शहर परिसरातील नागरिकांनी या रानभाज्या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजनाकंडून करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com