रानभाज्या महोत्सवाला सुरुवात

रानभाज्या महोत्सवाला सुरुवात

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

कळवण (मानूर) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कळवण (kalwan) (मानूर) येथे रानभाज्या महोत्सवाचे (Wild vegetable festival) आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र कापडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. आर. बी. आहेर यांनी केले. त्यांनी रानभाज्यांचे (Wild vegetable) महत्व सांगीतले. धावपळीच्या आजच्या युगात आपण नैसर्गिक आहाराकडे (Natural food) दुर्लक्ष करीत आहोत. निसर्गाने मानवसाठी सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतू त्याकडे होणारे दुर्लस तसेच पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण यासर्व गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर (health) होत आहे.

भाजीपाल्यावर रासायनिक औषधांचा अतिरिक्त वापर याचेही दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. म्हणूनच अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. बी. एस. पगार म्हणाले की, नैसर्गिक अधिवासात वाढणार्‍या या वनस्पती पावसाळ्यात उपलब्ध होत असतात. कोणतेही रासायनिक खते (Chemical fertilizers), औषधे यांचा वापर नसल्याने त्या पूर्णतः सेंद्रीय प्रकारात उपलब्ध होतात, तसेच त्यातील पौष्क घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

साधारणत जुलै ते आक्टोबर पर्यंत विविध प्रकारच्या रानभाज्या या कालावधीत उपलब्ध होत असतात. या प्रदर्शनात, कडुकंद गोयची, वासत्या, वाघाटी, तेर, कुरडु, धामडा, शिवण, रानभेंडी, हलुंदा, उलशी, तादुळका, कुंदरू, चुच, कडुजिरा, चिकण खरबडा, अंबाडी, मेखा, रानकारले, खाजकुचली, रानवांगे, कांचन, करटोले, हादगा, छोटी पडवळ, तोंडले, तरोटा, दगडीपाला, पाथरी, केना, पुदीना, माटला अशा विविध भाज्यांचा समावेश होता.

यामध्ये महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांमधीत्य विद्यार्थ्यांनी (students) उत्फुर्त सहभाग घेतला. प्रत्येक रान भाजीचे शास्त्रीय नांव, कुळ आणि त्यांचा उपयोग व महत्व सांगितले. याप्रसंगी याप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. पगार, बनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. बी. आहेर, प्रा. डॉ. यु. के. पवार, प्रा. एस. एम. पगार, प्रा. व्ही. एम. पगार, उपप्राचार्य राजेंद्र कापडे, प्रा. एस. एम. पगार, प्रा. डॉ. यु. के. पवार, डॉ. एन. बी. कोठावदे,

प्रा. एम. एन. पाटील, प्रा. प्रशांत नंदनवरे, डॉ. एस. जे. पवार, डॉ. मिलींद वाघ, डॉ.एच.व्ही.धाडे, प्रा. बी. सी. कच्छवा, प्रा. ठाकरे आदी उपस्थित होते. उपक्रम यशस्वीतेसाठी प्रा. प्रविण चौरे, प्रा.गणेश आहेर, प्रा. आशिष निकम, प्रा. व्ही. एम. पगार, प्रा. विलास मोरे प्रा. गावीत, प्रा. चौधरी आदींसह प्राध्यापकवृंद, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com