इंदिरानगर, पाथर्डी भागात जंगली प्राणी

इंदिरानगर, पाथर्डी भागात जंगली प्राणी

इंदिरानगर । प्रतिनिधी

इंदिरानगर भागातील पांडवनगरी, शिव कॉलनी, श्रद्धा विहार, आव्हाड मळा, राम मंदिर परिसर,चेतना नगर भागात तरस हा प्राणी पळत असताना काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्यानंतर घबराट निर्माण झाली होती. त्यानंतर सदरची माहिती वनविभाग अधिकार्‍यांना देण्यात आली. वन विभागाच्या शरद अस्वले, विशाल शेळके, विजय साळुंखे यांनी व नागरिकांनी तरसचा शोध घेतला.

परंतु मध्यरात्रीच्या सुमारास लष्कर हद्दीत असलेल्या भागात ते तरस निघून गेले. तरस ( Hyena) हा स्वतःहून हल्ला करीत नाही तो मेलेले प्राणीला आपले भक्ष बनवतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे वनविभागाकडून ( Department of Forest ) सांगण्यात आले आहे.

माजी नगरसेवक श्याम बडोदे, आशिष दाभोळकर, जयवंत टक्के, गोपाळ आव्हाड, मनीष पाटील, सुजित मोरे, दीपक जोशी, गोकुळ फड यांनीही मध्यरात्री तरसाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान माऊली लॉन्सकडेही एका तरसाचे दर्शन झाल्याने हे तेच तरस आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे?

पाथर्डी भागात शांताराम चुंबळे यांच्या शेतातील बंगल्याजवळ पुन्हा एकदा बिबट्याचे सीसीटीव्हीत दर्शन झाले आहे. त्यामुळे लष्करी हद्दीत असलेले जंगलातून हे प्राणी मानवी वस्तीकडे भक्षाच्या व अन्नाच्या शोधासाठी येत असल्याने रहिवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लक्ष देण्याची मागणी माजी सरपंच कैलास चुंभळे, लहानु चुंभळे, भास्कर चुंभळे, भाऊसाहेब शिरोडे, दीपक चुंभळे, बाजीराव चुंभळे, शांताराम चुंभळे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थांनी यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com