देवळा | Deola

तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथे करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असून आज काही तासाच्या अंतराने करोनाबधित पती आणि पत्नीचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील आहेर दांपत्य हे मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी कोरोना बाधित झाले होते.

त्यानंतर ते उपचार घेऊन घरी परतले होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास पांडुरंग आहेर (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास पत्नी किसनाबाई आहेर (६५) यांचेही निधन झाले.

या पती पत्नीच्या निधन झाल्याने परिसरात हळहळ होत आहे.