अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा सर्रास वापर

जनजागृती आणि नियंत्रण ठेवणे गरजेचे
अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा सर्रास वापर

नाशिक | शुभम धांडे Nashik

सोशल मीडियाचे social media जाळे, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात तंत्रज्ञानाची कमी वयात सहज ओळख झाल्यामुळे अल्पवयीन मुलांकडून Minors सोशल मीडियाचा नियमित वापर करण्यात येतो. त्यात अगदी पाच, सात वर्षे वयाच्या बालकांचीदेखील सोशल मीडियावर सक्रिय अकाउंट आढळून येतात.

अज्ञानापोटी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट किंवा खासगी माहितीचा गैरवापर होऊन त्यातून गुन्हेगारीच्या घटनादेखील उघडकीस आल्या आहेत.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्ट्राग्रामवर अकाउंट सुरू करण्यासाठी 13 वर्षे वय असणे गरजेचे आहे, असा नियम असला तरी या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर बरेच अकाउंट तेरावर्षांखालील मुलांचे असल्याचे आढळते, तर बरेच मुले आपल्या पालकांचे अकाउंट चालवत असल्याचे समोर आले आहे.

मुळात सोशल मीडियावर अकाउंट सुरू करण्यासाठी वय वर्षे तेरा असणे आवश्यक असते. मात्र खाते सुरू करताना वयाची पडताळणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे हा नियम केवळ कागदापुरता मर्यादित असल्याचे दिसून येते.

पालक, शिक्षकांनी काळजी घ्यावी

सोशल मीडिया वापरताना प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणे आवश्यक असते. विशेषत: ज्यांची मुले अल्पवयीन आहे, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. मुलांसमोर सोशल मीडियाचा टाळावा. घरातील किंवा वैयक्तिक खासगी माहिती शेअर करू नये. याबाबत मुलांना विश्वासात घेऊन माहिती द्यावी.बर्‍याचदा जेव्हां लहान मूल अशा माध्यमांचा वापर करतात, त्यावेळी न कळत ते आपल्या शिक्षकांना सुध्दा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, अशा वेळी शिक्षकांनी यांच गांभीर्य ओळखून याबाबत पालक सभेमध्ये चर्चा केली पाहिजे.

अज्ञानामुळे विपरित परिणाम

सोशल मीडियावर काय पोस्ट करावी, कोणती माहिती शेअर करावी किंवा कोणती माहिती सार्वजनिक करू नये, याविषयी अल्पवयीन बालकांना फारसे ज्ञान नसते. त्यामुळे खासगी माहिती सार्वजनिक होऊन त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. सोशल मीडियामुळे अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्याची उदाहरणे आहेत.

वयोमर्यादा पडताळणी यंत्रणेचा अभाव

सोशल मीडियावर अकाउंट सुरु करण्यासाठी मोबाइल नंबर, वय, ठिकाण यासह इतर माहिती भरावी लागते.खातेधारकाने दिलेली माहीती खरी आहे की खोटी याविषयीची पडताळणी करण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही.

इंटरनेट, सोशल मीडिया वापरण्यास वयोमर्यादा असली तरी वयासंबंधी पडताळणी करण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे कमी वयोगटातील मुलेदेखील सर्रासपणे सोशल मीडियाचा वापर करतात.त्यामुळे काही दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी पालकांनी लहान मुलांना मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही असे इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट देताना त्यावर पॅरेंटल कंट्रोल इंस्टॉल करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या गझेट वर ठराविक अ‍ॅप्लिकेशन, दिलेल्या वेळेत चालतील.ज्यामध्ये गूगल प्ले, यूट्यूब किड्स सारखे अ‍ॅप्लिकेशन सुध्दा अशा वेळी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ चालणार नाही. यासगळ्यांत जनजागृती आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com