बंदी असतानाही नायलॉन मांजाचा सर्रास वापर

बंदी असतानाही नायलॉन मांजाचा सर्रास वापर

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नायलॉन मांजावर (Nylon Manja) असलेली बंदी केवळ कागदावरच उरली असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात पंतगप्रेमींकडून (Kite) सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. सांकेतिक शब्दांचा वापर करून नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे सध्या शहरात चित्र आहे.

अनेकजण प्रशासनाची नजर चुकविण्यासाठी दुकानांऐवजी सार्वजनिक जागेत किंवा घरात रात्रीच्या वेळी नायलॉन मांजाची विक्री (Sale of nylon manja) करीत आहेत. परिणामी मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाने ‘कमबॅक’ केल्याने अपघाताचाही धोका वाढला आहे. तर अजून मकर संक्रात दुर असतानाही आताच नायलॉन मांजामुळे अनेकांना इजा होत असल्याचे समोर येत आहे. शहरातील काही भागांत कागद किंवा पिशवीत नायलॉन मांजा गुंडाळून ग्राहकांना दिला जात आहे.

गल्ली-बोळात असलेला मांजाचा गुंता आणि लहानग्यांच्या हातात दिसणार्‍या मांजामुळे हा काळाबाजार समोर येत आहे. या विक्रीमध्ये ‘गट्टू’, ‘पाकीट’, ‘पक्का धागा’ यांसारख्या सांकेतिक शब्दांचा वापर केला जात आहे. प्रशासनाला शंका येऊ नये यासाठी कागदामध्ये गुंडाळून सार्वजनिक जागेत भेटून ग्राहकांना मांजा दिला जात आहे. रात्री साडेनऊ नंतर घराच्या परिसरात हे व्यवहार होत आहेत. ग्राहकाकडून कोणताही धोका नसल्याची मध्यस्थाला खात्री पटल्यानंतरच मांजाची विक्री करण्यात येत आहे.

नावापुरती कारवाई

‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा शहरात दाखल होत असतो. अनेक व्यक्ती आणि पक्ष्यांचे बळी गेल्यानंतरही काही रुपयांच्या कमाईसाठी मांजाचा अवैध व्यापार करणारी मंडळी अचानक सक्रिय होत असते. पोलिस आणि प्रशासन देखील अनेकदा नावापुरती कारवाई करताना दिसतात. खरेतर नायलॉन मांजाला हद्दपार करण्यासाठी सातत्याच्या प्रयत्नांची गरज असून, त्याची विक्री करणार्‍यांनावर शासनाने कठोर कारवाई (Strict action) करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com