ऑडिटिंगच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांचे मौन का?: अ‍ॅड.ठाकरे

ऑडिटिंगच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांचे मौन का?: अ‍ॅड.ठाकरे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शतकोत्तर वाटचाल करत असतांना संस्थेचे कामकाज पारदर्शी असल्याचा खोटा दावा सरचिटणीसांकडून केला जातो. परंतु, संस्थेच्या लेखापरीक्षणाबाबत (audit) का बोलले जात नाही.

सभासदांपासून ऑडिट रिपोर्ट (Audit report) दडविला जात आहे. जिल्ह्यात मराठा समाजाचे ऑडिटर (Auditor of the Maratha Society) असतांना इतर व जिल्ह्याबाहेरील ऑडिटर नेमण्याचे काय कारण, याचे निटनेटके उत्तर द्यावे, असे आवाहन परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे (Adv. Nitin Thackeray) यांनी केले.

परिवर्तन पॅनलच्या बागलाण तालुक्यात (baglan taluka) दौर्‍यात ते बोलत होते. अ‍ॅड. ठाकरे म्हणाले, संस्थेचे ऑडिटर म्हणून काम करत असलेल्या मराठा समाजाच्या ऑडिटरला हिन व खालच्या पातळीची वागणूक देऊन, अधिकृत ऑडिटरला अनेक महिने ऑडिट करण्यासंदर्भात पत्र दिले जात नव्हते.

नगरच्या दुसर्‍या ऑडिटर संस्थेला काम दिले असतांना, त्यांना काम जमले नाही. तत्कालीन पदाधिकार्‍यांनी शरणागती पत्करुन पुन्हा आधीच्या ऑडिटर यांना नेमणुकीचे पत्र देण्यात आले. या सर्व प्रकाराबाबत बोलण्याचे टाळले जात असून, यातून पितळ उघडे पडण्याची भिती संबंधितांना वाटत आहे, असा थेट आरोप ड. ठाकरे यांनी केला. शंभरी पार केलेल्या संस्थेत केवळ सगळे कटपुथली आहे. स्वाभिमानी असलेला सभासद यंदा परिवर्तन केल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सटाणा तालुक्यातील (satana taluka) कंधाणे, वीरगाव, करंजाड, द्याने, नामपूर, लखमापूर येथे सभा संपन्न झाल्या. यावेळी बाळासाहेब क्षीरसागर यांनी परिवर्तनाची ही लाट सत्ताधार्‍यांना घरी पाठवेल. विद्यमान सभापती हे केवळ संस्थेची गाडी, ड्रायव्हर वापरतात, पण आजपर्यंत एकही सभासदाला त्यांना न्याय देता आला नाही, असे सांगितले. चिटणीस पदाचे उमेदवार दिलीप दळवी व डॉ. प्रसाद सोनवणे यांनी विजयी निर्धार व्यक्त केला. शिरीष राजे यांनी परिवर्तनतर्फे प्रहार विशेष पुस्तक बागलाण येथे नितीन ठाकरे यांनी प्रकाशित केले. अनेक मुद्यांना स्पर्श करत गंभीर सवाल उपस्थित केले.

बागलाणकरांनो यांना हद्दपार करा: कोकाटे

बागलाण तालुक्यातील सभासद हे नाशिक पासून दिल्ली पर्यंत मोठ्या पदांवर उद्योग व नोकरीत आहे.सजगतेबाबत कासमादे पट्टा अतिउच्च असून अशा वेळी त्यांनाच विकत घेण्याची भाषा करणार्‍यांना अद्दल घडवून परिवर्तन करा, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com