ओबीसी आरक्षणावर शरद पवार का बोलत नाहीत?

ओबीसी आरक्षणावर शरद पवार का बोलत नाहीत?

नाशिक | प्रतिनिधी

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजपने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thakaray), शरद पवार (Sharad pawar) आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे महाविकास आघाडी सरकारचे चालक आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळू नये असे वाटते आहे, आरक्षणाच्या विरोधात हे असून ते झारीतील शुक्राचार्य असल्याचा घणाघात माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे..

'डिसेंबर २०२२ पर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचे नाही असा महाविकास आघाडी सरकारचा कट आहे. आपण उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याने ओबीसी सेलच्या बैठकीला नव्हतो, पंकजा ताई नियोजित कार्यक्रमासाठी असल्याने त्याही गैरहजर होत्या. तसेच या बाबतीत कोन्हीही नसल्याचे त्यांनी आज नाशकात माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमुळेच अध्यादेश लॅप्स झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारने बाजू मांडलीच नव्हती. राज्य सरकारने इम्पिरिअल डेटा तयार करावा असे निर्देश न्यायालायने दिले होते. तरीही विधीमंडळाचा गैरवापर करून केंद्राने हा डेटा द्यावा हा बेकायदेशीर ठराव करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी याप्रसंगी केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com