भंगार वाहन लिलावाला प्रतिसाद का नाही?

मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश
भंगार वाहन लिलावाला प्रतिसाद का नाही?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC ) भंगारमध्ये पडलेल्या वाहनांचा ( Scrap Vehicles )अनेक वेळा लिलाव काढून देखील महापालिकेला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही (No response ).यामुळे लाखो रुपयांची भंगार वाहने महापालिकेकडे पडून आहेत. लिलावाला प्रतिसाद का मिळत नाही याबाबत महापालिकेचे आयुक्त प्रशासक रमेश पवार यांनी विशेष लक्ष दिले असून याबाबत चौकशी करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. लवकरच अधिकार्‍यांचा अहवाल आयुक्तांना सादर होणार आहे.

या वर्षांच्या सुरुवातीला महापालिकेच्या भंगारात पडलेल्या सुमारे 27 विविध प्रकारच्या वाहनांचे लिलाव काढण्यात आले होते, मात्र पाहिजे त्या प्रमाणात वाहनांना बोली न लागल्यामुळे 27 पैकी फक्त 4 वाहनांचे लिलाव झाले होते. यातून महापालिकेला 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, मात्र उर्वरित गाड्यांसाठी फेरलिलावाची प्रक्रिया होणार होती.

नाशिक महानगरपालिकेच्या विद्युत व यांत्रिकी विभाग (कार्यशाळा शाखा) तर्फे लिलाव प्रक्रीया करण्यात येते. लिलाव वर्कशॉप, मालेगांव स्टॅण्ड, पंचवटी नाशिक येथे झाले होते. यामध्ये ट्रक, जीप, जेसीबीसह इतर वाहनांचा समावेश होता. एक जीपचे पावणे दोन लाख तर इतर 3 गाड्यांचे सव्वा लाख रुपये याप्रमाणे 3 लाख रुपये महापालिकेला मिळाले होते. 27 पैकी फक्त चार वाहनांंच्या लिलाव करण्यात आला होता, तर पुन्हा गाड्यांचा लिलाव करण्याची तयारी महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, महापालिकेने सुमारे चार वेळा लिलाव प्रक्रिया राबवून फक्त निवडक वाहनांचा लिलाव झाला होता तर अद्यापही लाखो रुपयांची भंगार वाहने महापालिकेला सांभाळावी लागत आहे. यामुळे महापालिका आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहे, त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे. चौकशीचे अहवाल महापालिका आयुक्तांना मिळाल्यानंतर याबाबत धोरण निश्चित होणार असल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com