सर्वच तयार मग निमंत्रण पत्रिका का नाही?

सर्वच तयार मग निमंत्रण पत्रिका का नाही?

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाचे Marathi Literary convention भूमिपूजन तीन दिवसांपूर्वी झाले. या सोहळ्यातच स्वागताध्यक्षांनी उद्घाटक, प्रमुख उपस्थिती, विशेष उपस्थिती तसेच समारोपाच्या कार्यक्रमाचे विशेष उपस्थित पाहुणे यांची नावे जाहीर केली. जर सगळे ठरले आहे तर मग निमंत्रण पत्रिका Invitation Card का ठरत नाही? असा प्रश्न रसिकवर्गातून विचारला जात आहे.

संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत असे स्वागताध्यक्षांनी सांगितले असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सध्याची प्रकृती बघता ते येतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्याने निमंत्रण पत्रिकेला उशीर होत आहे का? असा प्रश्नदेखील रसिकांमध्ये निर्माण होत आहे.

दरम्यान, याबाबत संमेलनाच्या आयोजकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून या विषयावर कोणताही प्रकाश पाडण्यात आला नाही. उलटपक्षी पत्रिका खिशात आहे, आपण पत्रकार परिषद घेऊन ती प्रकाशित करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र या गोष्टीला 36 तास उलटून गेले तरी निमंत्रण पत्रिका खिशाच्या बाहेर येत नसल्याचे कारण गुलदस्त्यातच आहे.

निमंत्रण पत्रिकेबाबत यापूर्वीही अनेक वाद निर्माण झाले होते. यापूर्वी अतिउत्साहीपणे उद्घाटकांच्या नावाशिवाय ही संमेलन पत्रिका प्रकाशित करण्यात आली होती. तेव्हा उद्घाटक, विशेष पाहुणे, प्रमुख पाहुणे तसेच समारोपच्या कार्यक्रमासाठी कोण यांचेही नावे नव्हती. परंतु आता सर्वांची नावे आहेत. कार्यक्रम नियोजित झालेले आहेत तरीदेखील निमंत्रण पत्रिका का नाही? असा प्रश्न समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com