रेशन दुकानावर कारवाई का नाही? 'त्या' दाम्पत्याचा सवाल

रेशन दुकानावर कारवाई का नाही? 'त्या' दाम्पत्याचा सवाल

निफाड । प्रतिनिधी | Niphad

तालुक्यातील तारूखेडले येथील स्वस्त धान्य रेशन दुकानदारांकडून (Food ration shopkeepers) गव्हाची मागणी करणार्‍या दाम्पत्याला मारहाण (beating) करण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतरही अद्याप संबंधितावर कारवाई करण्यात आलेली नाही.

पुरवठा विभागाकडून (Supply Department) कारवाई न झाल्यास आत्मदहन (self-immolation) करण्याचा इशारा पती-पत्नीने दिला आहे. त्यामुळे पुरवठा विभाग काय कारवाई करते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. तारूखेडले येथे 1 जानेवारीला धान्य घेण्यासाठी गेलेल्या सचिन आंधळे व वैशाली आंधळे यांनी रेशन दुकानदाराकडे गव्हाची मागणी केली. मात्र, धान्य देण्याऐवजी दुकानदाराने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आंधळे दाम्पत्याने केला.

कथित घटनेनंतर 10 जानेवारीला निफाड तहसीलच्या (Niphad Tehsil) पुरवठा विभागाने तारूखेडले गाठत प्रकरणाची चौकशी केली. सदर घटना गैरसमजातून झाली असल्याचा अहवाल देत धान्य वाटपात मापात पाप होत नसल्याची स्पष्टोक्ती दिली होती. मात्र चौकशीसाठी गेलेल्या अधिकार्‍यांनी आम्हाला विचारणा का केली नाही, असा सवाल करत आंधळे दाम्पत्याने पुरवठा विभागाच्या कारवाईवरच संशय व्यक्त केला आहे.

घटनेची नोंद सायखेडा पोलीस ठाण्यात (Saykheda Police Station) करण्यात आली असताना मारहाणकर्त्यांवर थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोपही आंधळे दाम्पत्याने केला आहे. तर संबंधित रेशन दुकानदारावर कडक कारवाई न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या दाम्पत्याने दिला आहे. त्यामुळे आता सायखेडा पोलीस व निफाड तहसीलचा पुरवठा विभाग तारूखेडले प्रकरणात काय कारवाई करतात याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

आम्हाला मारहाण करणार्‍या रेशन दुकानदारावर कारवाई केल्याचे सायखेडा पोलिसांनी सांगितले. 14 दिवस कोठडी दिल्याचे पोलीस सांगत असताना 14 मिनिटेदेखील त्यांना कोठडी दिलेली नाही. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे.

- वैशाली आंधळे, पीडित महिला, तारूखेडले

मारहाणकर्त्यांवर कारवाईसाठी प्रयत्नशील तारूखेडले येथील रेशन दुकानदार मनमानीपणे धान्य वाटप करत असताना याप्रश्नी पुरवठा विभाग लक्ष घालत नाही. गव्हाची मागणी करणार्‍या दाम्पत्याला दुकानदाराने मारहाण केली असताना पुरवठा विभाग व पोलिसांनी कडक कारवाई केलेली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे.

- अ‍ॅड.सुरेंद्र सोनवणे, राज्य संघटक, ग्राहक पंचायत, नाशिक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com