इंधनशुल्क कपातीत आघाडी सरकारची पिछाडी का? : पालवे

इंधनशुल्क कपातीत आघाडी सरकारची पिछाडी का? : पालवे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारने (central government) पेट्रोल, डिझेलच्या (Petrol, diesel) उत्पादन शुल्कात (excise duty) कपात केल्यापाठोपाठ देशातील 11 राज्य सरकारने मूल्यवर्धित कर कपात करुन दिवाळीच्या (diwali) पार्श्वभूमीवर देशवासीयांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला.

जनतेच्या प्रश्नाच्या बाबतीत संवेदनाहीन असलेले ठाकरे सरकार केवळ राजकारण (politics) करत राज्य सरकारतर्फे इंधन शुल्क (Fuel charges) कमी न करता जनतेला इंधन किंमत कमी करण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) जनतेला केवळ आघाडी असल्याचे सांगत सुटले आहे, मात्र आघाडीत असलेले हे सरकार इंधन कपातीत पिछाडीवर का ? असा सवाल भाजपचे (bjp) नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे (girish palve) यांनी केला आहे.

गिरीश पालवे म्हणाले की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) भाव वधारल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून (Oil companies) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ सुरु आहे. या जागतिक संकटाचा सामना करत देशाचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी यातील सुवर्णमध्य साधत केंद्र सरकारने मूल्यवर्धित कर कपात केले. त्या पाठोपाठ देशातील उत्तरप्रदेश (uttar pradesh), त्रिपुरा (tripura), सिक्कीम (sikkim), आदीसह 11 राज्यांनी राज्याचे मूल्यवर्धित कर कपातीचा निर्णय घेतला. त्यातून देशवासीयांना मोठा दिलासा देण्याचं काम केले.

मात्र महाराष्ट्रातील आघाडी सरकार (mahavikas aghadi) केवळ राजकारण म्हणून केंद्र सरकारच्या निर्णयापाठोपाठ निर्णय घेण्यास असमर्थ ठरले आहे. आणि या राजकारणात राज्यातील इंधन दर वाढीचा फटका दिवाळीतही कायम ठेवत राजकारण खेळण्याचा डाव करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता अशा आघाडी सरकारला माफ करणार नाही. महाराष्ट्रात आघाडीचा गवगवा करणारे ठाकरे सरकार इंधन कपातीपासून राज्याला का दूर ठेवत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com