अंदाजपत्रकाचे वाटप तीन महिने विलंबाने का?

अंदाजपत्रकाचे वाटप तीन महिने विलंबाने का?

महापौरांचा सवाल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्थायी समितीने फेब्रुवारीत अंदाजपत्रक तयार केले तर मग प्रशासनाने अंदाजपत्रकीय महासभा बोलविण्यासाठी अंदाजपत्रकाचे वाटप (budget allocation ) 3 महिने विलंबाने का केले ?असा प्रश्न महापौर सतीश कुलकर्णी ( Mayor Satish Kulkarni )यांनी उपस्थित केला आहे.

महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून आतापर्यंत कधीही महापालिकेचे अंदाजपत्रक मार्च महिन्याच्या आधी मंजूर होऊन प्रशासनास सादर झाल्याचे निदर्शनास आलेले नाही व ही बाब प्रशासनही जाणून आहे, तसेच मी अनेक वर्षापासून महानगरपालिकेत सदस्य व विविध पदांवर कार्यरत आहे व मी आजपर्यंत नियमानुसार कामालाच प्राधान्य दिल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

सध्या अंदाजपत्रकावरून सुरू असलेल्या वादावर महापौरांनी खुलासा पाठवून त्यात प्रशासन व आयुक्तांनाच प्रश्न केले आहेत. मागील 25 ते 30 वर्षांचा इतिहास बघता महासभा अंदाजपत्रकास बर्‍याच वेळेस काही कारणास्तव विलंब झालेला आहे हि वस्तूस्थिती आहे. याची आयुक्तांंनी हि बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. या अगोदरच्या काही आयुक्तांनी स्थायी समितीस बजेट सादर केल्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीच्या अधिन राहून विकास कामे चालु केलेली होती.

याचप्रमाणे महासभेच्या बजेटच्या अंतीम मंजुरीच्या अधिन राहुन देखील कामे करण्यात आलेली आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास हरकत नव्हती.माझ्या कारकिर्दीत दोन वर्ष करोनाचे संकट असल्याने कामकाज करण्यास अडचणी येत असून तसेच करोना संदर्भातील कोणत्याही अत्यावश्यक खर्चाचे आयुक्तांचे अधिकार महासभेने अबाधीत ठेवलेले आहेत व महापौर म्हणून त्यास कायम सकारात्मकच प्रतिसाद दिलेला आहे. स्था

निक वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या निधीच्या पळवापळवी बाबत भाजपा पदाधिकार्‍यांना असमन्वय असे वृत्त आले, परंतु संबंधित पदाधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करुन शहर विकासाच्या दृष्टीकोनातून प्राधान्यक्रम असलेली विकासकामे घेण्याचे संबंधित पदाधिकार्‍यांच्या संमती व समन्वयानेच ठरल्यामुळे योग्य ते बदल करण्यात आले आहेत.

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागात विकासाची कामे झाली पाहिजे असा माझा प्रथम नागरिक या नात्याने प्रयत्न असल्याने 31 मे ते 21 जुलै दरम्यान लेखा विभागामार्फत आम्ही सुचविलेल्या कामांचा ठरावाबाबत लेखाजोखा प्राप्त झाला नाही तोपर्यंत त्यावर कार्यवाही करता आली नाही. लेखा विभागास दिलेल्या सुचनांनुसार आवश्यक दुरुस्ती करुन त्यांनी अंदाजपत्रक आता दिले असले तरी महानगरपालिकेच्या कोणत्याही अत्यावश्यक कामात खंड पडणार नाही याची काळजी महापौर म्हणून मी सतत घेतली आहे.

त्यामूळेच अंदाजपत्रकीय महासभेत दुरुस्तीसह मंजुरी देण्यात आली होती. वास्तविकतेला धरुनच मी अंदाजपत्रक दिलेलं आहे. कोणतेही फुगवटयाचें अंदाजपत्रक मी तयार केलेलें नाही. या विषयाबाबत प्रशासनाने माझ्याबरोबर चर्चा करणे क्रमप्राप्त होते तसे त्यांचेकडून झालेले दिसून येत नाही. असे ही महापौर यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com