म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालय कुणाचे ?; 'या' तारखेला होणार सुनावणी

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालय कुणाचे ?; 'या' तारखेला होणार सुनावणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan) येथे असलेल्या नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालय (Nashik Municipal Employees Labor Sena Office) नेमके कुणाचे या वादाप्रकरणी

दोनही गटाच्या दावेदारांची सहायक आयुक्त तथा विशेष न्यायदंडाधिकारी दिपाली खन्ना (Assistant Commissioner and Special Magistrate Dipali Khanna) यांनी चौकशी करून पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला होणार असल्याचे जाहीर केले.

शिवसेना (shiv sena) उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे हे नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष होते मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांची उध्दव ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात येऊन शिवसेना ठाकरे गट उपनेते बबनराव घोलप यांनी तिदमे यांच्या जागी अध्यक्षपदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (sudhakar badgujar) यांची नियुक्ती केली होती.

दरम्यान शिंदे गट शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बडगुजर (Sarkarwada Police Station) व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयावर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता तर बडगुजर यांनीही तिदमे यांच्याविरोधात अर्ज दिला होता.

याप्रकरणाची सुनावणी आज (दि. ३१) सहायक आयुक्त तथा विशेष न्यायदंडाधिकारी दिपाली खन्ना यांचे समोर होणार होती. यावेळी बडगुजर व तिदमे यांनी आपल्याकडे असलेली कागदपत्रे सादर केली. यावरून चौकशी करून पुढील सुनावणी येत्या १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com