दिंडोरीत कोण-कोण बाजी मारणार?

दिंडोरीत कोण-कोण बाजी मारणार?
दिंडोरी नगरपंचायत

जानोरी । संदीप गुंजाळ | Janori

प्रतिक्षेत असलेली दिंडोरी (dindori) नगरपंचायतीची (nagarpanchayat) निवडणूक (election) अखेर पार पडली. या निवडणुकीत अंतर्गत छुपी युती, ऐनवेळी पक्षांतर, दिग्गजांची प्रतिष्ठा आणि धनशक्ति याची जोरदार चर्चा झाली.

त्यात ओबीसी (OBC) जागेची निवडणूक रद्द झाल्याने पुन्हा नव्याने खुल्या पद्धतीने निवडणूक होणार आहे. उर्वरित जागेच्या निवडणूकीनंतरच झालेल्या सर्व जागांची मतमोजणी (vote counting) होणार असल्याने 19 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याने आकडेमोड करतांना उमेदवार दिसत आहे. लांबलेल्या निकालामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

करोनासदृश परिस्थितीमुळे राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणूका लांबणीवर गेल्याने अनेक इच्छुकांची ईच्छा हिरमोड झाली होती. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची लांबलेल्या निवडणुकांमुळे मतदारांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी मोठी दमछाक झाली हे मात्र नक्की. कधी एकदाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल याकडे डोळे लावून उमेदवार बसले होते. शेवटी निवडणूक प्रक्रिया (election process) सुरू झाल्यानंतर जागा कमी व इच्छुकांची संख्या जास्त असल्याने प्रमुख पक्षांना उमेदवार निवडतांना मोठी कसरत करावी लागली.

काहींनी ऐनवेळी उमेदवारी मिळत नसल्याचा अंदाज लावत अन्य पक्षांची उमेदवारी घेत कार्यकर्त्यांसह मतदारांना आश्चर्याचा धक्काच दिला. एकुण 17 जागांपैकी दोन प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली व एक जागा बिनविरोध पार पडली उर्वरित 14 जागेसाठी शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी काँग्रेस (rashtravadi congress), राष्ट्रीय काँग्रेस (congress) व भाजप (bjp) या पक्षांनी आपले उमेदवार उभे केले. काहींनी सोयीनुसार अपक्ष म्हणून उमेदवारी केली असे एकूण 43 उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावून आपापले नशीब आजमवले आहे.

14 जागांसाठी एकूण 12400 मतदारांपैकी 9784 मतदारांची मतदानाचा हक्क बजावत एकूण सरासरी 80% उच्चांकी मतदान दिंडोरीचे झाले आहे. एकूण 43 उमेदवारांचे नशीब मतदान पेटीत अडकले आहे. 19 जानेवारी पर्यंत निकालाची वाट बघावी लागणार असल्याने उमेदवारांचा जिव टांगणीला लागला आहे.

यात मतदान पेट्या सिलपॅक करून बंदोबस्तात ठेवल्या असल्यातरी उमेदवारांचीही याकडे कटाक्षाने पाळत ठेवली जात आहे. मतपेटीशी काही छेडछाड तर होणार नाही न? याची धास्ती उमेदवारांनी घेतली असली तरीही पोलिस यंत्रणेने मात्र चोख बंदोबस्त ठेवत काही संशयास्पद आढळून येणार नाही याकडे लक्ष ठेवून आहे. निवडणुकीत काही पक्षांनी खुली युती केली.

त्याच बरोबर छुपी युतीला महत्व देत आपल्या गटातील व मर्जीतील उमेदवार निवडून येतील याकडे पक्षश्रेष्ठींनी अधिकाधिक लक्ष दिले.यात ते कितपत यशस्वी होतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य आरक्षणावरून विजयी उमेदवार कोण होईल याची शक्यता वर्तवत नगराध्यक्ष पदासाठी योग्य व सोयीचा उमेदवार कोण असावा याची चाचपणी पक्षश्रेष्ठी करत आहेत.

उर्वरित दोन जागेपैकी एक महिला राखीव निघाल्याने प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींनी आपलाच उमेदवार निवडून यावे यासाठी कंबर कसली आहे. दोनच प्रभागात प्रचार करायची असल्याने प्रचारासाठी सोयीस्कर असले तरी या दोन प्रभागाच्या निवडणुकीदरम्यान जनशक्तिची चर्चा होणार की धनशक्तिचा हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com