जिल्हा बँक प्रशासकपदी कोण?

आरिफ ठरले राजकीय दबावाचे बळी ?
जिल्हा बँक प्रशासकपदी कोण?
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष Chairman of the Board of Governors of Nashik District Bank तथा सहायक आयुक्त मोहम्मद आरिफ Assistant Commissioner Mohammad Arif यांनी मंगळवारी (दि.14) प्रशासकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे या पदावर आता कोण येणार? याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.दरम्यान,आरिफ यांनी दिलेला राजीनामा हा राजकीय दबावामुळे दिला असल्याची चर्चा आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचे संचालक मंडळ डिसेंबर २०१७ मध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरकारभाराचा ठपका ठेवत बरखास्त केले आहे. राज्य शासनाने दि.२२ मार्चला तीन सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश दिले. मुंबई व उपनगरे, पूर्व ते पश्चिम एसआरए सहकारी संस्थांचे सहायक आयुक्त मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखालील या प्रशासक मंडळात सहकारी संस्थांचे उपनिबंधक चंद्रशेखर बारी तसेच सनदी लेखापाल तुषार पगार यांचाही सदस्य म्हणून समावेश होता.

परंतु,तुषार पगार यांनी बँकेचा हा काटेरी मुकुट स्विकारलाच नाही. त्यामुळे आरिफ व बारी यांनीच बँकेचा कारभार हाती घेतला. त्यातही चंद्रशेखर बारी यांनी काही महिन्यांपूर्विच राजीनामा दिल्याने आरिफ हे एकटे प्रशासक म्हणून काम करत होते. परंतु, मंगळवारी (दि.14) त्यांनी वैयक्तिक कारणास्तव साखर आयुक्तांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

अरिफे निवृत्त अधिकारी असून जिल्हा बँकेचा प्रशासक म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. आरिफ यांनी दिलेला राजीनामा मागे घेण्यासंदर्भात राज्य शासन त्यांच्यावर दबाव आणू शकत त्यामुळे त्यांचा राजीनामा हा स्विकारला जाईल,असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे बँकेचा प्रशासक म्हणून नवीन नियुक्ती होईपर्यंत विभागीय उपनिबंधक यांच्या कडे हा पदभार तात्पुरत्या स्वरूपात जाईल असे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

Related Stories

No stories found.